लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नाशिक: महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या रौप्य महोत्सवी वर्धापन दिनानिमित्त नऊ आणि १० जून रोजी विद्यापीठाच्या शिक्षक प्रशिक्षण प्रबोधिनीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

शुक्रवारी सकाळी सात वाजता हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानापासून फेरी काढण्यात येणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे उपस्थित राहणार आहेत. विशेष पाहुणे म्हणून जिल्हाधिकारी गंगाथरन डी,, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल उपस्थित राहणार आहेत. शिक्षक प्रशिक्षण प्रबोधिनीत विद्यार्थी कल्याण विभागातर्फे आयोजित बक्षीस वितरण सोहळ्यास माजी सनदी अधिकारी डॉ. किरण बेदी, कुलगुरू माधुरी कानिटकर उपस्थित राहणार आहेत. दुपारी तीन वाजता स्पंदन हा विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम होईल. सायंकाळी पाच वाजता टपाल तिकीट प्रकाशन आणि सुवर्णपदक वितरण सोहळा पार पडणार आहे. यावेळी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार अध्यक्षस्थानी असतील. पालकमंत्री दादा भुसे, डॉ. किरण बेदी, पुणे टपाल विभागाचे मुख्य रामचंद्र जायभावे उपस्थित राहतील.

आणखी वाचा-समाज माध्यमातून सामाजिक तेढ वाढविल्यास कारवाई, पोलिसांचा इशारा

१० जून रोजी सकाळी ११ वाजता विविध पुरस्कार, बक्षीस वितरण सोहळा होणार आहे. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे प्रतिकुलपती गिरीश महाजन, राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाचे डॉ. अरूणा वनीकर, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाचे सचिव डॉ. अश्वनी जोशी उपस्थित राहणार आहेत. यावेळी माजी कुलगुरूंचा सत्कार होणार असून उत्कृष्ट महाविद्यालयांना गौरविण्यात येणार आहे. २४ वर्षे सेवापूर्ती केलेल्या अधिकाऱ्यांचाही सत्कार होणार आहे.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rally tomorrow by arogya university postage stamp release mrj
First published on: 08-06-2023 at 18:56 IST