नाशिक : शहरातून वाहणाऱ्या नंदिनी नदीच्या प्रवाहात गाळ, दगड, वीटा, माती व कचरा साचून अडथळा निर्माण झाली असून त्यामुळे पाणीही साचून राहत आहे. अशी ठिकाणे डासांची उत्पत्तीस्थाने बनली असून नदीकाठालगतच्या परिसरात डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया व इतर साथीचे आजार पसरण्यास ही बाब कारणीभूत ठरत आहे. 

नंदिनीला प्रवाही ठेवण्यासाठी चर खोदले गेले होते. परंतु, तिथे आता गाळ, कचरा अडकल्याने अडथळे आले. प्रभाग क्रमांक २४ मधील तिडकेनगर, कर्मयोगीनगर, जगतापनगर, कालिका पार्क, बाजीरावनगर, गोिवदनगर, सदगुरुनगर, उंटवाडीसह नदीकाठच्या परिसरात डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया व इतर साथीचे आजार वेळोवेळी पसरतात.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नदी पात्रातील अस्वच्छतेने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. चरातील गाळ, दगड, वीटा, गोटे, इतर घाण यंत्राने काढल्यास चरातील पाणी प्रवाहीत होईल. या संदर्भात फाऊंडेशनचे अध्यक्ष बाबासाहेब गायकवाड (देशमुख), शिवसेना कार्यकत्र्या चारूशिला गायकवाड (देशमुख), शिवसेना शाखाप्रमुख बाळासाहेब िमधे आदींनी पालिका आयुक्त कैलास जाधव व शहर अभियंता नितीन वंजारी यांना निवेदन दिले. संपूर्ण पात्राची स्वच्छता करून किनारा सुशोभित करावा, दोंदे पूल परिसरात मोठय़ा प्रमाणात कचरा टाकला जातो, त्यास प्रतिबंध करावा, रस्त्यालगत पेव्हरब्लॉक बसवावे, अशी मागणी निवेदनात करण्यात आली  आहे. दरम्यान, शहरात एखाद्या इमारतीत वा घरात डासांची उत्पत्ती स्थान आढळल्यास महापालिकेकडून कारवाई केली जाते. नंदिनी पात्रात ठिकठिकाणी साचलेले पाणी ही डासांची उत्पत्तीस्थाने आहेत. पात्र स्वच्छ राखण्याची जबाबदारी महापालिकेवर आहे. गोदावरीत कचरा टाकला जाऊ नये म्हणून विविध पातळीवर दक्षता घेतली जाते. त्याच धर्तीवर नंदिनीकडे लक्ष देण्याची गरज व्यक्त करण्यात येत आहे.