नाशिक : सप्तश्रृंग गडावरील मंदिराच्या नुतनीकरणाच्या कामास महिनाभरात सुरूवात होणार आहे. पुढील चार ते पाच दशकांचा विचार करून हे काम करण्यात येणार आहे. श्री सप्तश्रृंगी निवासिनी देवी ट्रस्टने कर्मचारी, सेवक आणि पुजाऱ्यांसह गडावरील ग्रामस्थांना आरोग्य सुरक्षा कवच उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. संबंधितांना आरोग्य सेवा सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शहरातील सुयश रुग्णालयाशी सामंजस्य करार करण्यात आला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

याबाबतची माहिती ट्रस्टचे अध्यक्ष तथा जिल्हा न्यायाधीश वर्धन देसाई, विश्वस्त ॲड. ललित निकम, रुग्णालयाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. हेमंत ओस्तवाल यांनी पत्रकार परिषदेत दिली. ट्रस्ट आणि सुयश रुग्णालयाकडून गडावरील सर्व ग्रामस्थांना आरोग्य कार्ड उपलब्ध करून दिले जाणार आहे. त्या माध्यमातून शिबिरांमध्ये मोफत निदान तसेच रुग्णालयामध्ये दाखल करण्याची वेळ आल्यास सवलतीत उपचार केले जातील, अशी माहिती डॉ. ओस्तवाल यांनी दिली. करारानुसार विश्वस्त संस्थेचे सर्व कर्मचारी तसेच मौजे सप्तश्रृंग गड गावातील सर्वांना आरोग्यविषयक सुविधा दिल्या जाणार आहेत.

हेही वाचा >>> Mumbai News Live : पंतप्रधान मोदी आज मुंबई दौऱ्यावर, मेट्रो २ सह विविध प्रकल्पाचं करणार लोकार्पण; जाणून घ्या प्रत्येक अपडेट

गडावरील ४० वर्षापुढील सर्वांची प्राथमिक आरोग्य तपासणी गडावर शिबीर घेऊन नि:शुल्क केली जाणार आहे. तसेच १० वर्षावरील मुली, महिलांसाठी मासिक पाळी येण्यापासून ते जाण्यापर्यंतच्या सर्व समस्यांच्या निदानासाठी गडावर शिबिरांचे आयोजन केले जाईल. तंबाखूमुळे मौखीक तसेच इतर कर्करोग होऊ नये म्हणूनही शिबीर घेतले जाईल. गडावरील संस्थेचे कर्मचारी तसेच ग्रामस्थांना सुयश रुग्णालयामार्फत प्रसंगी नि:शुल्क अथवा सवलतीच्या दरात आरोग्य सेवा देण्याचे नियोजन आहे. ग्रामस्थ, कर्मचाऱ्यांनी आरोग्य तपासणी केल्यानंतर संबंधितांना आरोग्य कार्ड वितरीत केले जाईल, अशी माहिती देसाई आणि डॉ.ओस्तवाल यांनी दिली.

हेही वाचा >>> नाशिक : कलामंदिरातील समस्या सोडवणुकीसाठी पालकमंत्र्यांना साकडे

दरम्यान, यावेळी विश्वस्त ॲड. निकम यांनी मंदिराच्या नुतनीकरणाबाबतची माहिती दिली. ३५ ते ४० वर्षांपासून मंदिराचे नुतनीकरण झालेले नाही. पुढील चार ते पाच दशकांचा विचार करून नुतनीकरण करण्यात येणार आहे. महिनाभरात या कामाचे भूमिपूजन होईल असे त्यांनी सांगितले. मंदिराचा संपूर्ण गाभारा चांदीचा केला जाणार आहे. फनिक्युलर ट्रॉलीलगतच्या भागात संस्थेचे प्रशासकीय कार्यालय उभारले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Saptashringidevi temple renovated fort villagers health protection cover employees ysh
First published on: 19-01-2023 at 10:15 IST