गुजरात राज्यात सलग सत्तावीस वर्षे सत्ता ठेवूनही बहुमताने तेथे जागा येत आहेत. याचाच अर्थ जनतेशी नाते आणि तेथे झालेल्या विकासकामांमुळे जनता भाजप पाठीशी उभी राहते, हे गुजरातमध्ये विधानसभा निवडणूक निकालानंतर स्पष्ट झाले, अशी प्रतिक्रिया पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली.

हेही वाचा- “शरद पवारांनी दत्त उपासना करावी, ४८ तासांचा अल्टिमेटम देऊन…”, सीमाप्रश्नावरून महंतांचा सल्ला

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शहरातील अजिंठा विश्रामगृहात गुरुवारी दुपारी मंत्री पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. याप्रसंगी भाजपचे चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण, अरविंद देशमुख उपस्थित होते. गुजरात राज्यातील विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून, यात भाजपला पुन्हा स्पष्ट बहुमत मिळाले आहे. निवडणूक निकालानंतर मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, एक्झिट पोलमध्येही भाजपा सर्वांत मोठा पक्ष असेल, असे सगळे चित्र दिसत होते. ही देशाची निवडणूक प्रतिष्ठेची आणि चुरशीची होती. कारण, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गुजरातमध्ये राहतात आणि साहजिकच आहे, पंतप्रधान मोदी यांनी त्यांनी मुख्यमंत्रिपदावर असताना केलेली विकासकामे आणि टिकवून ठेवलेले राज्यातील जनतेशी नाते, त्याचबरोबर तिथे असलेले संघटन याचा विचार केला, तर यातूनच त्यांना बहुमताचा कौल मिळत आहे. महाविकास आघाडी जी महाराष्ट्रमध्ये आहे, त्यांनी या गोष्टीचा बोध घेण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.