Supply and Sanitation Minister Gulabrao Patils reaction on gujrat-election-result | Loksatta

‘विकासालाच जनतेचा कौल’: गुजरात निवडणूक निकालावर गुलाबराव पाटील यांची प्रतिक्रिया

गुजरात विधानसभा निवडणुकीचे निकाल जसजसे स्पष्ट होत आहेत. तसतशा राजकीय प्रतिक्रिया येत आहेत. पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील यांनी गुजरात निकालावर प्रतिक्रिया व्यक्त केलीय.

‘विकासालाच जनतेचा कौल’: गुजरात निवडणूक निकालावर गुलाबराव पाटील यांची प्रतिक्रिया
गुलाबराव पाटील (संग्रहित छायाचित्र)

गुजरात राज्यात सलग सत्तावीस वर्षे सत्ता ठेवूनही बहुमताने तेथे जागा येत आहेत. याचाच अर्थ जनतेशी नाते आणि तेथे झालेल्या विकासकामांमुळे जनता भाजप पाठीशी उभी राहते, हे गुजरातमध्ये विधानसभा निवडणूक निकालानंतर स्पष्ट झाले, अशी प्रतिक्रिया पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली.

हेही वाचा- “शरद पवारांनी दत्त उपासना करावी, ४८ तासांचा अल्टिमेटम देऊन…”, सीमाप्रश्नावरून महंतांचा सल्ला

शहरातील अजिंठा विश्रामगृहात गुरुवारी दुपारी मंत्री पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. याप्रसंगी भाजपचे चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण, अरविंद देशमुख उपस्थित होते. गुजरात राज्यातील विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून, यात भाजपला पुन्हा स्पष्ट बहुमत मिळाले आहे. निवडणूक निकालानंतर मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, एक्झिट पोलमध्येही भाजपा सर्वांत मोठा पक्ष असेल, असे सगळे चित्र दिसत होते. ही देशाची निवडणूक प्रतिष्ठेची आणि चुरशीची होती. कारण, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गुजरातमध्ये राहतात आणि साहजिकच आहे, पंतप्रधान मोदी यांनी त्यांनी मुख्यमंत्रिपदावर असताना केलेली विकासकामे आणि टिकवून ठेवलेले राज्यातील जनतेशी नाते, त्याचबरोबर तिथे असलेले संघटन याचा विचार केला, तर यातूनच त्यांना बहुमताचा कौल मिळत आहे. महाविकास आघाडी जी महाराष्ट्रमध्ये आहे, त्यांनी या गोष्टीचा बोध घेण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.

मराठीतील सर्व नाशिक / उत्तर महाराष्ट्र ( Nashik ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 08-12-2022 at 15:14 IST
Next Story
नाशिक-सिन्नर महामार्गावर बस-दुचाकीच्या अपघातात दोन दुचाकीस्वारांचा मृत्यू; बसही जाळून खाक