लोकसत्ता टीम

नाशिक: विविध प्रकारच्या पारंपरिक व्यवसायातील कारागिरांच्या सक्षमीकरणासाठी प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेची अमलबजावणी करण्यात येत आहे. प्रत्येक योजना लोकप्रतिनिधी व प्रशासन यांच्यातील समन्वय व सहकार्यातून यशस्वी होत असते. या योजनेच्या प्रभावी अमलबजावणीसाठी सर्वांचे सहकार्य व प्रयत्न आवश्यक असल्याचे केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी सांगितले.

pune metropolis have lack of basic facilities and infrastructure
बकालीकरणाकडे…
Ladki Bahin Yojna Sudhir Mungantiwar 2100 rs Installment
Ladki Bahin Yojna : लाडक्या बहिणींना २१०० रुपयांसाठी…
Aditi Tatkare
मविआतील बंडखोरी आदिती तटकरेंच्या पथ्यावर ?
maharashtra vidhan sabha election 2024 uncle dharmarao baba atram vs nephew ambrishrao atram in aheri assembly constituency gadchiroli print politics news
अहेरीत आत्राम काका-पुतण्यात थेट लढत? अपक्षांमुळे प्रस्थापितांच्या मनात धाकधूक…
Ajit Pawar claimed area honorables deprived Kharadi Chandannagar of water for tanker business
अन्यथा मते मागायला येणार नाही, असे उपमुख्यमंत्री अजित पवार का म्हणाले !
Udayanraje Bhosale criticism of Sharad Pawar candidate
पाडा पाडा म्हणणाऱ्या पवारांचे उमेदवारच लोक पाडतील; उदयनराजे यांचे टीकास्त्र
Maharashtra Elections Assembly Elections 2024 Election Commission
महाराष्ट्र वाहून जाणार की आपली वेगळी वाट आखणार?

रविवारी भगवान विश्वकर्मा जयंती निमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलेल्या प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेच्या शुभारंभ कार्यक्रमाचे दूरदृष्यप्रणालीद्वारे थेट प्रक्षेपण महाकवी कालिदास कला मंदिर येथे करण्यात आले. यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी आमदार प्रा. देवयानी फरांदे, सीमा हिरे, जिल्हाधिकारी जलज शर्मा, मनपा आयुक्त अशोक करंजकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, यांच्यासह जिल्ह्यातील विविध व्यवसाय करणारे कारागीर मोठ्या संख्येने उपस्थित होते. या योजनेच्या माध्यमातून जिल्ह्यातील सर्व कारागिरांचे सक्षमीकरण होण्याच्या दृष्टीने गावामधील शेवटच्या गरजू घटकांपर्यंत ही योजना पोहचवावी. या योजनेच्या माध्यमातून १८ प्रकारचे विविध पारंपरिक व्यवसाय पुढच्या पिढीपर्यंत पोहचण्यास मदत होईल. या योजनेंतर्गत २०२७-२८ पर्यंत देशातील साधारण ३० लाख कारागिरांना लाभ देण्यात येणार आहे. असे डॉ. पवार यांनी सांगितले.

आणखी वाचा-नाशिक: सारंगखेडा पुलाला भगदाड, नंदुरबार-धुळे वाहतूक मार्गात बदल

प्रास्ताविकात जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी १८ विविध प्रकारच्या पारंपरिक व्यवसाय करणाऱ्या कारागिरांना या योजनेच्या माध्यमातून १५ हजार रुपयांचे साहित्य संच देण्यात येणार असल्याचे नमूद केले. मूलभूत प्रशिक्षण पूर्ण झाल्यांनतर लाभार्थ्यांना विनातारण कर्ज देखील उपलब्ध करून देण्यात येईल. या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी हा हस्त कौशल्याद्वारे विविध साधनांचा वापर करून स्वयंरोजगाराची निर्मिती करणारे कलाकार आणि कारागीर असणे गरजचे आहे. लाभार्थ्यांचे वय १८ वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक असणे आवश्यक आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले.

प्रारंभी, आमदार फरांदे यांनी मनोगत व्यक्त केले. त्यानंतर सुतार, लोहार, सोनार, शिल्पकार, नाभिक असे विविध व्यवसाय करणाऱ्या व्यक्तिंचा प्रातिनिधीक स्वरूपात सत्कार करण्यात आला. तर प्रधानमंत्री स्वनिधी योजना, प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले.