News Flash

ऑपरेशन मुस्कान मोहीम

महाराष्ट्र राज्यात ऑपरेशन मुस्कान महाराष्ट्र - २ शोध मोहीम घेण्याचे आदेश दिले आहेत.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक यांनी १ जून ते ३० जून २०१६ या कालावधीत सन २०१० ते ३१ मे २०१६ पर्यंत हरविलेल्या बलकांचा शोध घेण्याकरिता संपूर्ण महाराष्ट्र राज्यात ऑपरेशन मुस्कान महाराष्ट्र – २ शोध मोहीम घेण्याचे आदेश दिले आहेत. त्याअनुषंगाने नवी मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रात १ जून ते ३० जून या कालावधीत ऑपरेशन मुस्कान महाराष्ट्र २ ही शोधमोहीम राबविण्यात येणार आहे. ऑपरेशन मुस्कान महाराष्ट्र २ या शोधमोहीम कालावधीत सन २०१० ते ३१ मे २०१६ पर्यंतच्या कालावधीत हरविलेल्या व पळविलेल्या पंरतु मिळून न आलेल्या मुलांची माहिती नव्याने अद्ययावत संकलित करण्यात येणार आहे. नवी मुंबई आयुक्तालयातील मुलांचे आश्रयगृह, अशाकीय संस्था, रेल्वे स्थानके, बस स्थानके, रस्त्यावर किंवा सिग्नलवर भीक मागणारी अथवा वस्तू विकणारी मुले, कचरा गोळा करणारी मुले तसेच धार्मिक स्थळे, रुग्णालये आदी ठिकाणी कामे करणारी मुले अशा मुलांना हरविलेली मुले समजून फोटो घेऊन अशा मुलांची माहिती www.trackthemisssingchild.com <http://www.trackthemisssingchild.com/> या संकेतस्थळावर भरण्यात येणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 1, 2016 5:30 am

Web Title: operation smile ii launched from 1 june to 30 june to trace missing children
टॅग : Missing Children
Next Stories
1 ‘नीट’चा संभ्रम मिटवण्याचा ‘मार्ग’
2 पुनर्बाधणीत नवप्रश्नांचा अडसर
3 आयुक्तांच्या ‘नायक’ शैलीची धास्ती
Just Now!
X