नवी मुंबई: महिलेच्या मनात लज्जा उत्पन्न होईल, तिच्या एकांतवासाचा भंग होईल, या कलमान्वये माजी नगरसेवक भरत जाधव यांच्या विरोधात वाशी रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. मात्र हे राजकीय षडयंत्र असल्याचा दावा जाधव यांनी केला आहे. 

पीडित महिला काही वैयक्तिक कारणांनी पती पासून वेगळे राहत होत्या. मात्र पतीशी त्यांचा संपर्क होता. वेगळे राहून त्या नोकरी करून गुजराण करीत होत्या.  काही दिवसापूर्वी पीडित  महिला ही नोकरी करत असलेल्या ठिकाणाहून आपले काम संपवून घरी परतत  असताना भरत जाधव यांनी पीडित महिलेस फोन केला. ज्यावेळी फोन केला त्यावेळी ही महिला सीवूड रेल्वे स्थानकाच्या फलाटावर लोकलची वाट पाहत उभी होती. त्यावेळी जाधव यांचा फोन त्यांना आला. पीडितेस त्यांनी मोठ्या पगाराच्या नोकरीचे आमिष दाखवले तसेच तिच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे भाष्य केले.

हेही वाचा… नवी मुंबई : अल्प मानधन वाढीमुळे महापालिका शिक्षकांमध्ये असंतोष; आंदोलनाचा इशारा

पीडितेला आर्थिक तंगी होती, हे जाधव यांना माहिती होते. ही घटना घडल्यावर पीडितेने आपल्या पतीला या बाबत माहिती दिली. दोघांनी सदर घटनेबाबत पोलीस ठाण्यात तक्रार करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार वाशी रेल्वे पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीची दखल घेत जाधव यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. 

हेही वाचा… नवी मुंबई : विसर्जन मिरवणुकीसाठी वाहतुकीत बदल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याबाबत भरत जाधव यांना प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी हे राजकीय षडयंत्र असल्याचा दावा केला. विविध  खोटे गुन्हे यापूर्वीही दाखल केले मात्र प्रत्येक गुन्ह्यात मला न्याय मिळाला आहे. या प्रकरणातही काही दिवसातच सत्य समोर येईल असा दावाही त्यांनी केला.