शनिवारी सकाळी साडे नउच्या सुमारास शीव पनवेल मार्गावर डीझेल संपल्याने एक डंपर बंद पडला.त्यामुळे झालेल्या वाहतूक कोंडीने ट्रक चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यात ट्रक क्षमतेपेक्षा जास्त वजन वहन करत असल्याचे लक्षात आल्याने ३० हजार रुपयांचा दंड बसलाच शिवाय ९० दिवसांच्या साठी वाहन चालवण्याचा परवाना रद्द करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

हेही वाचा >>> नवी मुंबई : दोन जेष्ठांच्या घरात चोरी, बँक लॉकरची किल्लीही चोरट्यांनी नेली

Shiv Panvel Highway, Accident, Accident on Shiv Panvel Highway, Ola App Passengers, Raises Safety Concerns, ola drivers, ola cab, marathi news, panvel news, panvel, accident news,
शीव-पनवेल महामार्गावरील रात्रीच्यावेळी प्रवास सुरक्षित आहे का ?
Navi Mumbai Municipality, Palm Beach Road, Traffic Jams , sion panvel highway, Due to concretization, navi mumbai news, marathi news, road construction in navi mumbai,
काँक्रीटीकरणामुळे ‘पामबीच’वर वाहतूककोंडी
heavy traffic in patri pool area in kalyan
कल्याण : पत्रीपुलामुळे पुन्हा मनस्ताप, आता रस्ते कामामुळे अभूतपूर्व वाहतूक कोंडी
Ten bridge
राज्य मार्गावरील टेन पुलाचा कठडा बनला धोकादायक, दुरुस्ती कामासाठी दोन महिन्यांचा कालावधी लागणार

आपल्या वाहनात इंधन किती आहे याचा अंदाज न आल्याने एका ट्रक चालकाला चांगलाच आर्थिक फटका बसला आहे. शनिवारी सकाळी हाशीम पटेल यांचा डंपर (एमएच ४६ बी यु ४८४८ ) चालक अनिल मसुरकर हा चालक नवी मुंबई नियोजित विमानतळ येथून दगड घेऊन खारघर येथे घेऊन जात होता.सीबीडी येथील उड्डाण पुलावर पुणे मार्गिकेवर हा डंपर बंद पडला. त्यामुळे सुमारे तीन किलोमीटर पर्यत वाहनांच्या रांगा लागल्या व प्रचंड मोठी वाहतूक कोंडी झाली. तांत्रिक बिघाड झाल्याने डंपर बंद पडला असेल म्हणून वाहतूक पोलिसांनी सदर डंपर बाजूला  घेण्यासाठी प्रयत्न सुरु केले. मात्र वाहन चालक याने डंपर डिझेल संपल्याने बंद पडल्याचे सांगितल्यावर वाहतूक पोलिसांनी डोक्यावर हात मारून घेतला. हि वाहतूक कोंडी सोडवण्यास सुमारे दोन तास गेले. त्यामुळे पोलिसांनी वाहन चालकाच्या विरोधात निष्काळजी पणाने वाहन चालवण्याने वाहतूक कोंडीस कारण ठरला म्हणून गुन्हा दाखल केला. यावेळी डंपर मध्ये मोठ्या प्रमाणात दगड असल्याचे लक्षात आल्याने वजन तपासण्यात आले. त्यावेळी क्षमतेपेक्षा अधिक असल्याचे निदर्शनास आल्याने.३० हजार ५०० रुपयांचा दंड ठोठावला. तसेच ९० दिवस परवाना रद्द करण्याची निर्देश उपप्रादेशिक परिवहन विभागाला देण्यात आले आहेत.

हेही वाचा >>> उरण : सिडकोने विकासाच्या नावाने शेतकऱ्यांना नेस्तनाबूत केले ,ज्येष्ठ वास्तुविशारद चंद्रशेखर प्रभू यांचे गावठाण हक्क परिषदेत प्रतिपादन

जगदीश शेलकर (वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाहतूक विभाग) शीव पनवेल मार्गावर बेशिस्तीने वाहन चालवल्याने वाहतूक कोंडी होत असून वाहतूक नियमांची पायमल्ली करून बेजावादारपणे वाहन चालविणाऱ्या वाहन चालकांच्या विरोधात वेळोवेळी कारवाई अधिक कडक करण्यात आली आहे. त्यामुळे वाहतुकीचे नियम पाळून वाहन चालकांनी सहकार्य करावे.