सोमवारी दुपारी शीव पनवेल महामार्गलगत जुई नगर स्टेशन शेजारील नाल्यात एक मृतदेह आढळून आला. या मृतदेहाची ओळख अद्याप पटली नाही. पुढील वैद्यकीय तपासणी साठी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.सोमवारी दुपारी एकच्या सुमारास शीव पनवेल मार्गावर जुईनगर नाल्यात मृतदेह असल्याची खबर कंट्रोल रूम मधून प्राप्त झाली. त्यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक शाम शिंदे यांनी तत्काळ एक पथक मृतदेहाच्या शोधार्थ पाठवले. काही वेळातच मृतदेह जुईनगर रेल्वे स्तेशांच्या शेजारील नाल्यात आढळून आला.

हेही वाचा >>>नवी मुंबई : सुरक्षित म्हणून जुगारासाठी लॉज बुक केले मात्र पोलीस तेथेही पोहचले

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मृतदेहाची पाहणी केली असता अंदाजे ३५ ते ४० वर्षीय पुरुषाचा मृतदेह असल्याचे दिसून आले. मात्र मृतदेह पूर्ण सडलेल्या अवस्थेत होता. तो कोणी आणून टाकला कि तेथेच हत्या झाली वा नैसर्गिक मृत्यू झाला या बाबत तपास सुरु आहे. अशी माहिती नेरूळ पोलिसांनी दिली.