नवी मुंबई शहरातील सायन पनवेल महामार्गावरील तुर्भे, बेलापूर, नेरुळ याठिकाणी या वाहनांचा अधिक समावेश असतो. परंतु यामध्ये अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनांचा ही समावेश असतो . वाहन परवाना नसणे, योग्यता प्रमाणपत्र नसणे, अवैध प्रवासी वाहतूक तसेच वाहनांच्या क्षमतेपेक्षाही अधिक प्रवासी नेणे इत्यादी अवैध वाहतूक केली जाते. यामुळे अपघाताच्या घटना घडतात. त्यामुळे आरटीओच्यावतीने अशा वाहना कारवाई करण्यात येत असून एप्रिलपासून आत्तापर्यंत अवैध वाहतूक करणाऱ्या १४७ गाड्यांवर कारवाई करून १५ लाखांहून अधिक दंडात्मक वसुली करण्यात आलेली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा- नवी मुंबई : अर्धा वाशी खाडी पुल अंधारात… तर अर्धा खाडीपूल उजेडात

नवी मुंबई शहरात वारंवार अवैध प्रवासी वाहतूक, अवैध माल वाहतूक सुरूच असते. त्यावर आरटीओ कडून वारंवार कारवाई ही केली जाते. मात्र तरी देखील शहरात आजही अवैध वाहतूक केली जात आहे. यामध्ये वाहतुकीचा परवाना नसणे , योग्यता प्रमाणपत्र नसणे अवैध प्रवासी वाहतूक केली जाते. एखाद्या मालाची वाहतूक कारायची असेल मालवाहतूक व्यासायिक वाहनाने करावी लागते. मात्र अनेकदा काही खासगी वाहने अल्प दरात प्रवासी वाहतुकीबरोबर व्यसायिक मालवाहतुक करताना दिसत असतात. त्यामुळे अवैध वाहतुकीला आळा घालण्यासाठी नवी मुंबई आरटीओ विभागाकडून सातत्याने कारवाई करण्यात येत आहे . एप्रिलपासून आतापर्यंत एकूण १४७ वाहनांवर कारवाई करण्यात आली असून १५ लाख २० हजार ६०७ रुपये दंडात्मक वसुली करण्यात आलेली आहे.

हेही वाचा- घरफोडी करण्यासाठी पुणे, मुंबई, नवी मुंबईत फिरणाऱ्या २ अट्टल आरोपींना अटक

अवैध वाहतूक करण्याऱ्या चालकांवर वचक बसावा यासाठी वाहनांवर हा कारवाईचा करण्यात येत आहे. यापुढे ही अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती नवी मुंबईच्या आरटीओचे उपप्रादेशिक अधिकारी हेमांगी पाटील यांनी दिली.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Action taken against 147 vehicles carrying illegal traffic in navi mumbai dpj
First published on: 13-12-2022 at 16:10 IST