नवी मुंबई : नवी मुंबईत शिवसेनेची ताकद दिवसेंदिवस वाढत आहे. मंगळवारी उबाठा गटाला मोठा धक्का बसला आहे. शिवसेना उबाठा पक्षातील दहा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मंगळवारी शिवसेना (एकनाथ शिंदे  गटामध्ये  जाहीर प्रवेश केला आहे. वाशी येथील शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात हा प्रवेश सोहळा शिवसेनेचे उपनेते विजय नाहटा, बेलापूर विधानसभा शिवसेना जिल्हाप्रमुख किशोर पाटकर आणि शहर प्रमुख विजय माने आणि माजी नगरसेवक रतन मांडवे तसेच शिवसैनिक यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आणि कार्यशैलीवर प्रभावित होऊन  नवी नवी मुंबईत  शिवसेना शिंदे गटात मोठ्या प्रमाणात अधिकारी व कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश  होत आहे. मागील अनेक वर्षापासून सीवूडची विभागात ॲड  कौस्तुभ मोरे व मंदार मोरे राजकीय व सामाजिक क्षेत्रात सातत्याने कार्यालयात आहेत. त्यांनी आज  उत्साहात, भगवा झेंडा हाती घेत या कार्यकर्त्यांनी शिवसेनेत पक्षप्रवेश केला.या पदाधिकाऱ्यांमध्ये  शिवसेना उपशहरप्रमुख ॲड . कौस्तुभ भाऊ मोरे , धनश्री कौस्तुभ मोरे महिला विभाग संघटिका, सिद्धार्थ गायकवाड ,उपविभाग प्रमुख, अजय पावसकर उपविभाग प्रमुख,  शशिकांत कांबळे ,शहर प्रमुख, सैजाद शहा शाखाप्रमुख, कलाम पांगारकर शाखाप्रमुख,  मयुर जंगम उप-शाखाप्रमुख,  गणेश खंडागळे ,उप-शाखाप्रमुख आणि   ॲड.मंदार भाऊराव मोरे  हे ठाणे लोकसभा संघटक, शेकाप यांचा आज शिवसेना शिंदे गटात पक्षप्रवेश झाला आहे .

पदाधिकाऱ्यांच्या या पक्षप्रवेशावेळी  शिवसेना उपनेते विजय नाहटा आणि जिल्हाप्रमुख किशोर पाटकर यांनी सांगितले की,आज उबाठा गटातील हे सर्व कार्यकर्ते पक्षात दाखल झाल्याने आमची ताकद अधिकच वाढली आहे, आगामी  मुंबई महापालिका निवडणुकीत  याचा शिवसेना  शिंदे गटाला नक्कीच फायदा होईल.

सीवूडस पूर्व विभागात मोरे  बंधूंचा दांडगा जनसंपर्क …

सीवूडस पूर्व विभागात  सामाजिक कार्यात तसेच राजकीय क्षेत्रात या दोन्ही मोरे बंधूंचा चांगला  जनसंपर्क आहे.  त्यामुळे आगामी  नवी मुंबई महापालिका निवडणुकीत   त्यांच्या पक्षप्रवेशाचा शिवसेना शिंदे गटाला  फायदा होईल असे चित्र आहे.