नवी मुंबई: जामिनावर सुटलेल्या आरोपीने पोलिसांना १७ वर्ष गुंगारा दिला मात्र शेवटी पोलिसांनी शोध घेत त्याला बेड्या ठोकळ्याच. दरम्यान २० वेळा तो पोलिसांच्या हातावर तुरी देत पाळण्यात यशस्वी झाला. मात्र कानून से भाग सकते हो बच नही सकते या उक्ती प्रमाणे अखेर पोलिसांनी त्याला १७ वर्षांनी जेरबंद केलेच रोशनलाल अरोरा असे अटक आरोपीचे नाव असून त्याच्या विरोधात २००५ मध्ये नेरुळ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला होता. षोड वयीन मुले आंबट शौकील लोकांना तो बीभत्स अश्लील चित्रफीत असलेल्या सीडी विकत होता. या बाबत माहिती मिळताच तत्कालीन अधिकाऱ्यांनी बनावट ग्राहक पाठवून खात्री करून घेत त्याला अटक केली होती. त्याला बंदी असलेल्या चित्रफीत सीडी विकणे व कॉपीराईट कायान्वये कारवाई करण्यात आली होती. मात्र आपली जामीनावर सुटका करून त्याने घेतली मात्र न्यायालयाच्या खटल्याच्या सुनावणी कामी वारंवार गैरहजर राहत होता. त्यामुळे न्यायलयानी नमूद आरोपीवार अजामीनपात्र वॉरंट जारी करून सुध्दा तो हजर राहत नव्हता.
हेही वाचा >>> नवी मुंबई: मैदान वाचविण्यासाठी स्थानिक आमदार मंदा म्हात्रे विरोधात आमरण उपोषणाचा इशारा
न्यायलयांनी नमूद आरोपीवर न्यायलयात हजर राहणेसाठी पर्यावणारी उदघोषणा / जाहिरनामा वॉरंट जारी केले होते. नमुद आरोपी हा गेली १७ वर्षापासून आपले अस्तीत्व लपवून आपली अटक टाळत होता. सदर आरोपीच्या अटकेसाठी नेरूळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक . तानाजी भगत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक निवास शिंदे, पोलीस हवालदार विजय कांगणे, रशीद पटवेकर यांच्या पथकाने नमुद आरोपीचा गोपनीय माहितीव्दारे शोध घेवून त्यास नेरूळ परीसरातील सेक्टर ३ येथून बुधवारी ताब्यात घेत अटक केली . अशी माहिती तानाजी भगत यांनी यांनी दिली.
हेही वाचा >>> नवी मुंबई: स्वच्छ भारत अभियानात बक्षीस पटकावणाऱ्या नवी मुंबईत अस्वच्छता
हा गुन्हा आरोपीने वयाच्या अठ्ठेचाळिसाव्या वर्षी केला आणि जामिनावर सुटल्यावर फरार झाला, आणि ६५ व्या वर्षी अटक झाला. विशेष म्हणजे या दरम्यान त्याचा २० वेळा ठावठिकाणा शोधला मात्र पोलिसांना गुंगारा देण्यात तो यशस्वी झाला. यात पोलिसांनी माहिती देताना अजून एक बाब अधोरेखित केली ती म्हणजे अश्लील सीडी विक्री प्रकरणी त्याला अटक केली आणि त्याच्यावर तेव्हा प्रत्यक्ष कारवाई झाली. आजच्या पिढीला सीडी म्हणजे कॉम्पॅक्ट डिस्क हे माहिती सुद्धा नाही.