नवी मुंबई : गाडीला गाडी घासली अशा किरकोळ अपघात सिमेंट मिक्सर गाडी चालकाचे अपहरण केल्या प्रकरणी निलंबित सनदी अधिकारी पूजा खेडकर यांचे वडील दिलीप खेडकरआणि वाहन चालक प्रफुल्ल साळुंके याच्या विरोधात गुन्हा दाखल होता. रबाळे पोलिसांनी आज पहाटे धुळे येथून वाहन चालक प्रफुल्ल याला अटक केली असून खेडकर याचा शोध सुरु आहे.

१३ तारखेला मुलुंड ऐरोली मार्गांवर सिमेंट मिक्सर गाडी आणि एका कारचा किरकोळ अपघात झाला होता. कार चालक प्रफुल्ल आणि खेडकर यांनी कारची नुकसान भरपाई दिली नाही म्हणून मिक्सर चालक प्रल्हादकुमार चौहान याचे अपहरण करून पुणे येथील औंध येथील बंगल्यात डांबून ठेवले होते. या प्रकरणी रबाळे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच रबाळे पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या मदतीने शोध घेत खेडकर यांच्या घरी पोहचले. त्या ठिकाणी खेडकर याची पत्नी मनोरमा हिने पोलिसांना घरात येऊ दिले नाहीच शिवाय अंगावर कुत्रे सोडले.रबाळे पोलिसांनी या प्रकरणी फिर्याद दाखल करीत चतुश्रृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता.

गुन्ह्याचे गांभीर्य ओळखत रबाळे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत यांचे मार्गदर्शनाखाली आरोपीचा घेणे सुरु केले. यांचा शोध घेणे व अपहरण केलेल्या इसमाची सुटका करणे यासाठी रवाना केले होते. सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश पाळदे यांचे पथकाने तांत्रिक विष्लेशन व गोपनीय खबरीनें दिलेल्या महिवरून संशयित आरोपी प्रफुल्ल ज्ञानेश्वर सांळुखे यास धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा येथुन ताब्यात घेवुन अटक केली आहे. न्यायालल्याने त्याला २४ तारखे पर्यंत पोलीस कोठाडी फर्मावली आहे.

मनोरंमा खेडकर यांनी पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला. तिने अपघात ग्रस्त गाडी लपवणे, बंगल्यातील सीसीटीव्हीचा डी व्ही आर लपवून ठेवणे सरकारी कामात अडथळा निर्मण केले म्हणून पोलिसांनी गुन्हा नोंद केलेला आहे. आता पोलीस या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी दिलीप खेडकर याचा शोध घेत आहेत…