नवी मुंबई – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ८ ऑक्टोबर रोजी नवी मुंबई नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन पार पडले. या आंतरराष्ट्रीय विमानतळाच्यया बांधकामामागे कठीण भौगोलिक परिस्थितीवर मात करून केलेले शास्त्रीय नियोजन कोणी केले याबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. हे काम झारखंडमधील धनबाद येथील सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ मायनिंग अँड फ्युएल रिसर्च (CIMFR) या संस्थेतील शास्त्रज्ञांच्या मार्गदर्शनामुळे पुर्ण झाले असून एक आव्हानात्मक प्रकल्प यशस्वीपणे पूर्ण करण्यात आला आहे.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हे उलवे टेकडी ज्याची उंची ९२ मीटर इतकी होती, ती समतल करून आणि उलवे नदीचे प्रवाह मार्गांतर करून बांधण्यात आला. CIMFR चे संचालक डॉ. ए. के. मिश्रा यांनी सांगितले की, अदानी समूह आणि सिडको यांनी सार्वजनिक-खाजगी भागीदारीत हा विमानतळ उभारताना वैज्ञानिक सहाय्यासाठी CIMFR कडे मदत मागितली होती. या प्रकल्पा अनेक शास्त्रज्ञांनी आपली मते मांडली आहेत.
“विमानतळाचे ठिकाण ९२ मीटर उंच, १.६ किमी लांब आणि १.२ किमी रुंद उलवे टेकडीसमोर होते. तसेच उलवे नदीचे मार्गांतर करणेही आवश्यक होते. परिसरात आठ गावे आणि सुमारे ४०० घरे होती. शिवाय मुंबईला वीजपुरवठा करणाऱ्या उच्चदाब विद्युतवाहिन्यांमुळे स्फोट नियंत्रित ठेवणे हे मोठे आव्हान असल्याचे .या प्रकल्पातील CIMFR चे संचालक डॉ. ए. के. मिश्रा यांनी सांगितले.
त्यांच्या मते, सिडकोला यापूर्वीच्या कामांच्या अनुभवावरून विश्वास होता की CSIR-CIMFR चे शास्त्रज्ञ हे सर्व अडचणी शास्त्रीय पद्धतीने दूर करू शकतात. परदेशी तंत्रज्ञानाविना विमानतळ उभारण्याचा निर्धारही त्यांनी केला होता. यासाठी २०१६ मध्ये सिडकोने CIMFR च्या रॉक रिसर्च इंजिनिअरिंग समूहाशी विशेष चर्चा केली. विमानतळाचे बांधकाम जून २०१७ मध्ये सुरू झाले. शास्त्रज्ञांनी सुट्टी न घेता हे काम पुर्ण केले. “सुपर-कंट्रोल्ड ब्लास्टिंग” तंत्रज्ञानाच्या मदतीने ६२ दशलक्ष घनमीटर खडक त्या क्षेत्रातून हटवण्यात आले.
शास्त्रज्ञ डॉ. सी. सोमानिया यांनी सांगितले की, परिसरातील गावे आणि उच्चदाब विद्युतवाहिन्यांमुळे निर्माण होणारे कंप नियंत्रणात ठेवणे हे सर्वात मोठे आव्हान होते. पण शास्त्रज्ञांच्या समूहाने ते यशस्वीरीत्या पार पाडले.”
– टीमचे नेतृत्व करणारे डॉ. एम. पी. राय काय म्हणाले
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारणीसाठी पहिला नवी मुंबई दौरा जानेवारी २०१७ मध्ये झाला. ते एक नागरी क्षेत्र असल्याने अनेक तांत्रिक आव्हाने होती. आमच्या पूर्वीच्या प्रकल्पांतील अनुभवामुळे आम्हाला आत्मविश्वास मिळाला.
– कोविड-१९ महामारीच्या काळात कामाची गती कमी झाली, पण थांबवली गेली नाही.
डॉ. रंजीत कुमार पासवान यांनी सांगितले की, स्फोटातून बाहेर काढलेले खडक भूविकासासाठी वापरण्यात आले, आणि प्रत्येक स्फोटाची रचना स्वतंत्रपणे केली गेली. तर, डॉ. विवेक कुमार हिमांशू यांनी सांगितले, “२०१७ मध्ये स्फोटक टीमचा भाग असणे ही माझ्यासाठी अभिमानाची बाब होती.”
वरिष्ठ तांत्रिक अधिकारी सुरज कुमार म्हणाले की, मी मे २०१७ मध्ये संस्थेत रुजू झालो आणि जूनमध्ये या प्रकल्पातील पहिल्या स्फोटात सहभागी झालो. मी शेवटच्या स्फोटापर्यंत या टीमचा भाग होतो. परिसरातील लोकही आमच्या कामाने समाधानी होते.
रामशंकर यादव यांनी सांगितले की, २४ मीटर उंच टेकडीवरील ६०० स्फोटक छिद्रांचे ब्लास्टिंग चार टप्प्यांमध्ये करण्यात आले. हे अत्यंत आव्हानात्मक पण यशस्वी काम होते.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हा भारतातील सर्वात मोठा ग्रीनफिल्ड विमानतळ प्रकल्प आहे. जो सार्वजनिक- खाजगी भागीदारी तत्त्वावर विकसित करण्यात आला आहे. मुंबई महानगर प्रदेशासाठी दुसरा आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळासोबत (CSMIA) कार्य करेल. त्यामुळे प्रवासी वाहतुकीवरील ताण कमी होईल आणि मुंबईचे जागतिक दर्जाच्या मल्टी-एअरपोर्ट सिस्टिम्समध्ये स्थान मजबूत होईल.