नवी मुंबई : उन्हाळा सुरू होताच एपीएमसी फळ बाजारात थंडगार, रसाळ फळांच्या हंगामाला सुरुवात होत असते. सध्या बाजारात लाल रंगाच्या रसरशीत कलिंगड, टरबूज त्याचबरोबर पपई, द्राक्ष दाखल होण्यास सुरुवात झाली असून, याला अधिक मागणी आहे.

उन्हाळा सुरू झाला असून, नागरिक रसाळ व थंडगार पेयाला पसंती देत असतात. त्यामुळे रस पेयाची मागणीदेखील वाढत आहे. शरीराला थंडावा देणारी कलिंगडे बाजारात मुबलक उपलब्ध झाली असून, त्यांना ग्राहक पसंती देत आहेत. उन्हाळ्याची चाहूल लागताच आंब्यापाठोपाठ फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात फळ बाजारात कलिंगडे दाखल होण्यास सुरुवात होते, तर मार्चपासून त्यांच्या मागणीत वाढ होते. महाराष्ट्रसह तामिळनाडू, आंध्रप्रदेश, कर्नाटक येथून आवक होते. उन्हाळ्यात रस पेयाबरोबर फ्रुट सलाडलादेखील अधिक मागणी असते.

हेही वाचा – मुंबईः नोकरी शोधणाऱ्या महिलांचा विनयभंग; चाळीस महिलांना अश्लील व्हिडिओ कॉल करणाऱ्यास अटक

फ्रुट सलाडमध्ये कलिंगडचे प्रमाण मोठया प्रमाणावर असते. हे कलिंगड सोलापूर, सांगली, अक्कलकोट, गुलबर्गा येथून बाजारात दाखल होत असतात. सध्या बाजारात कलिंगड ३२६० क्विंटल आवक होत असून, प्रति क्विंटल ८०० – १३०० रुपये तर किरकोळमध्ये ५० – ७० रु प्रतिनग दिले जात आहे. बाजारात शुगर बेबी आणि नामधारी या प्रजातीच्या कलिंगडची आवक सुरू असून, यामध्ये शुगरबेबीला अधिक मागणी आहे. खरबूजची आवक १०२० क्विंटल असून प्रतिक्विंटल १५०० ते २५०० रुपयांनी विकले जात आहे. तर ८१० क्विंटल पपई दाखल होत असून, प्रतिक्विंटल २५०० – ३५०० रुपये दर आहे. तर संत्रीची आवक ९३२ क्विंटल असून, ७ हजार ते ८ हजार रुपये प्रति क्विंटल दर आहे.

हेही वाचा – मुंबई: राज्यातील ३१३ मोठया गृहप्रकल्पांकडे महारेराचे लक्ष

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आंब्याच्या १४०० पेट्या दाखल

यंदा हापूसचा हंगाम उशिराने पण चांगला असेल, असा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे. जानेवारी महिन्यात हापूसची एक-दोन पेटी आवक होती. परंतु, फेब्रुवारीपासून हापूस त्याचबरोबर रायगड आणि कर्नाटक आंब्याची आवक वाढण्यास सुरुवात झाली आहे. मागील आठवड्यात हापूसच्या ४०० ते ५०० पेट्या दाखल झाल्या होत्या. तेच आज सोमवारी बाजारात ९०० पेट्या दाखल झाल्या असून ४ ते ८ डझनाच्या पेटीला ३ ते ८ हजार रुपये बाजारभाव असून मागील आठवड्यापासून हे दर स्थिर आहेत. तसेच रायगड आणि कर्नाटकच्या ३००-४०० पेट्या दाखल झाल्या आहेत.