उरण : गेल्या आठवडा भर सायंकाळी सुरू असलेल्या परतीच्या पावसामुळे पिकलेली भात पिके जमीनीवर आणि पावसात कोसळून कुजू लागल्याने उरण मधील शेतकऱ्यांच्यता हाता तोंडाशी आलेल्या पिकांचे नुकसान होत आहे. या शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे सुरू करण्याची मागणी चिरनेर येथील शेतकऱ्यांनी तालुका कृषी विभागाकडे केली आहे.

उरणमध्ये परतीचा पाऊस हा विजेच्या कडकडाटसह सुरू झाला आहे. त्यामुळे याचा नागरिकांना फटका बसत आहे. मात्र या पावसाने शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. यावर्षी ऑगस्ट महिन्यात सलग पंधरा दिवस पावसाचा खंड पडला होता. त्यामुळे उरण मधील शेकडो हेक्टर जमिनीवरील भातपिके संकटात आली होती. मात्र त्यानंतर जोरदार पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे भात शेतीत पाणी वाढल्याने भात पिकांना संजीवनी मिळाली होती. त्यामुळे उरण तालुक्यातील नागाव,केगाव,चाणजे व खोपटे,कोप्रोली, चिरनेर, विंधणे, रानसई, वशेणी, पूनाडे, आवरे पाले, पिरकोन, वेश्वी, गोवठणे, बोरखार आदी गावात भात शेतीचे पीक घेणारे शेतकरी आनंदले होते.

हे ही वाचा…सिडकोच्या महागृहनिर्माण योजनेसाठी २४ तासांमध्ये १२,४०० इच्छुकांचे अर्ज

उरण तालुक्यात साधारण २ हजार ५०० हेक्टर पेक्षा अधिक भात क्षेत्र आहे. यातील बहुतांशी शेती ही खाडी किनाऱ्यावर आहेत. त्यातच यातील शेतीचा वापर हा उद्याोग आणि रस्ते तसेच इतर विकास कामासाठी केला जात असल्याने पिकत्या शेतीचे क्षेत्र कमी झाले आहे. मात्र जेथे शेती होत आहे, तेथे पावसाच्या अनियमिततेमुळे शेतकरी संकटात आला आहे. सध्या परतीच्या पावसाने कहर केला आहे. दररोज सायंकाळी वादळीवाऱ्यासह जोरदार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे भात पीके आडवी पडून पाण्याखाली येऊ लागली आहेत. परिणामी ती कुजून जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे ४० टक्के नुकसान झाले असून यात भर पडण्याची शक्यता आहे. या नुकसानीचे कृषी विभागाने लवकरात लवकर पंचनामे सुरू करण्याची मागणी केल्याची माहिती चिरनेर येथील शेतकरी प्रफुल्ल खारपाटील यांनी दिली आहे.

हे ही वाचा…पनवेल : कळंबोलीत चॉकलेटचे आमिष दाखवून बालिकेवर अत्याचार

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शेतकरी संकटात

उरण तालुक्यात साधारण २ हजार ५०० हेक्टर पेक्षा अधिक भात क्षेत्र आहे. यातील बहुतांशी शेती ही खाडी किनाऱ्यावर आहेत. त्यातच यातील शेतीचा वापर हा उद्याोग आणि रस्ते तसेच इतर विकास कामासाठी केला जात असल्याने पिकत्या शेतीचे क्षेत्र कमी झाले आहे. मात्र जेथे शेती होत आहे, तेथे पावसाच्या अनियमिततेमुळे शेतकरी संकटात आला आहे.