पनवेल : अवकाळी पावसाचा मारा मागील तीन दिवसापांसून कोकणात सुरू असल्याचा सर्वाधिक फटका पालेभाज्यांसह पाडव्याच्या फुलविक्रीला बसला आहे. मंगळवारी पनवेलच्या फूल बाजारात भिजलेल्या फुलांची आवक झाल्याने अनेक ग्राहकांना डागाळलेली आणि भिजलेली फुले खरेदी करावी लागली. त्यामुळे वधारलेल्या दराने फुलबाजारात मंदीचे चित्र दिसले.

हेही वाचा – नवी मुंबई : स्वतःच्या लहान मुलीस बेदम मारहाण करणाऱ्या आई-वडिलांविरुद्ध गुन्हा 

आठवडाभरापूर्वी ३० ते ४० रुपये प्रति किलोग्रॅमने विकल्या जाणाऱ्या पिवळा गोंड्याची थेट १०० ते १२० रुपये प्रति किलोग्रॅम विक्री पनवेलच्या बाजारात सुरू होती. बाजारात चढ्या दराने भाव देण्यास तयार असलेल्या ग्राहकांनाही फुले भिजलेलीच खरेदी करावी लागल्याने ग्राहकांचा मंगळवारी फूल खरेदीकडे कमी कल पाहायला मिळाला. पनवेलमध्ये मुंबई (परळ), पुणे आणि कल्याण येथून फुले विक्रीला येतात. यामध्ये पिवळा झेंडू, गुलछडी, कलकत्ता झेंडू, गुलाब, बिजली अशा फुलांची मागणी बाजारात आहे.

फुलेघाऊक प्रति किलोआठ दिवसांपूर्वीचे दर प्रति किलो
पिवळा गोंडा १०० ते १२० रुपये ३० ते ४० रुपये
गुलछडी४०० रुपये १०० रुपये
बिजली१२० रुपये१०० रुपये
गुलाब ८० रुपये बंडल ४० रुपये बंडल

हेही वाचा – नवी मुंबई : पगार मागितला म्हणून मारहाण करीत व्यक्तीला तिसऱ्या माळ्यावरून ढकलले 

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पाडव्याचा उत्साह आहे. मात्र अवकाळी पावसामुळे घाऊक बाजारात भिजलेल्या फुलांची आवक झाल्याचा मोठा फटका यंदाच्या पाडव्याच्या हंगामात व्यवहाराला बसला आहे. मागणी जास्त आणि पुरवठा कमी झाल्याने चार पटीने दरवाढ झाली. नेहमीच्या गिऱ्हाइकांना सणाच्या दिवशीही चांगला माल मिळाला पाहिजे हेच प्रत्येक फुल व्यापाराला वाटते, असे सोमनाथ फ्लोवर डेकोरेटरचे मालक सोमनाथ इचके म्हणाले.