नवी मुंबई: नवी मुंबईतील सी वुड्स भागातील माजी नागरसेवक भरत जाधव यांनी रायगड जिल्ह्यातील कर्जत पोलीस ठाण्यात विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. सध्या त्यांच्यावर नवी मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरु असून या घटनेने खळबळ उडाली आहे.  घटनेपूर्वी स्वतःची व्यथा एका व्हिडीओ त्यांनी व्हायरल केला होता.

नवी मुंबई मनपातील माजी नगरसेवक भरत जाधव यांनी रायगड जिल्ह्यातील कर्जत पोलीस ठाण्यात विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. आपली व्यथा मांडल्यावर अचानक खिशातील विषाची बाटली त्यांनी तोंडाला लावत विष प्राशन केल्याने पोलीस ठाण्यातही खळबळ उडाली. हि घटना शनिवारी घडली . विष प्राशन करण्यापूर्वी स्वतःच्या गाडीत त्यांनी स्वतःचा व्हिडीओ चित्रित केला होता. त्यात त्याच्यावर झालेल्या अन्याय त्यांनी कथन करीत मालमत्ता खरेदी विक्री रखडलेले प्रकल्प त्या मागून घेतलेले कर्ज, बँकेचे कर्ज त्याचे व्याज आदी बाबत व्यथा मांडली . बीड, कर्जत (जी रायगड) आणि जामखेड मध्ये फसवणूक झाली असा दावा त्यांनी व्हिडिओत केला आहे. 

हा व्हिडीओ त्यांनी समाज माध्यमात प्रसारित केला मात्र काही वेळात तो डिलीट केला तरीही काही ठिकाणी व्हायरल झाला होता. 

या प्रकरणी कर्जत पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेंद्र गरड यांनी दिलेल्या माहिती नुसार जाधव हे शनिवारी पोलीस ठाण्यात आले होते. त्याची फसवणूक झाल्याबाबत त्यांनी व्यथा मांडली. आम्ही त्यांचे पूर्ण म्हणणे ऐकून घेत होतो. मात्र अचानक त्यांनी एक बाटली खिशातून काढली आणि त्यातील विष प्राशन केले. घटनेचे गांभीर्य ओळखून त्यांना तात्काळ कर्जत सरकारी दवाखान्यात दाखल केले. दरम्यान त्यांच्या नातेवाईकांना बोलावून घेतले गेले . कर्जत रुग्णालयात  प्राथमिक उपचार झाल्यावर त्यांनी नवी मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या प्रकरणी भरत जाधव स्वतः वा त्यांच्या नातेवाईकांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही.