नवी मुंबई ः खारघर उपनगरामध्ये पुढील काही मिनिटांमध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर प्रचारसभा होणार आहे. या सभेत भारतीय जनता पक्ष महायुतीच्या उमेदवारांना विजयी करण्यासाठी पंतप्रधान मोदी हे नागरिकांना आवाहन करणार आहेत. मात्र मागील आठवडाभरापासून खारघर उपनगरातील स्वच्छतेचा कायापालट केला जात आहे. दुपारचे ऊन डोक्यावर असले तरी स्वच्छता कर्मचारी रस्ते स्वच्छ करण्यात मग्न आहेत. खारघरमधील अस्वच्छता आणि एकही धुलीकण पंतप्रधानांच्या नजरेस पडू नये याची खबरदारी घेतली जात आहे. सरकारी प्रशासनाची ही कर्तव्यदक्षता पाहून खारघरवासीय अवाक झाले आहेत. खारघरनगरीत पंतप्रधानांचा दौरा सहा महिन्यांतून एकदा तरी असावा अशी मागणी सामान्य खारघरवासियांकडून होत आहे.

निसर्गाने खारघर उपनगराला डोंगररांगांची भेट दिली आहे. येथील निसर्गसंपदेच्या संवर्धनासाठी खारघरवासीय डोंगरावर मोठ्या प्रमाणात वृक्षारोपन करुन लावलेल्या रोपांना स्वता उन्हाळ्यात पाणी देऊन जगवतात. परंतु खारघरमधील रस्त्यांमधील खड्ड्यांमुळे आणि फुटलेल्या गटारांमुळे प्रशस्त रस्ते असलेल्या खारघरमध्ये वाटेत चालताना जपून चालण्याची वेळ नागरिकांवर येते. सध्या पनवेल महापालिकेने शहरातील मुख्य रस्ते कॉंक्रिटीकरणाचे काम हाती घेतल्याने पुढील काही वर्षात खारघरचे मुख्य रस्ते कॉंक्रीटचे होतील अशी अपेक्षा आहे. मात्र खारघरच्या हवेत मोठ्या प्रमाणात धुलीकणांचा समावेश असल्याने श्वसनदाह रुग्ण या परिसरात मोठ्या प्रमाणात आढळतात. राज्य व राष्ट्रीय महामार्गांसोबत, तळोजा औद्योगिक वसाहत आणि मोठ्या प्रमाणात चालणारे बांधकाम व्यवसायामुळे धुलीकणांमध्ये वाढ होत असल्याचे सांगितले जाते. परंतु सध्या पंतप्रधान मोदी यांच्या गुरुवारच्या खारघरमधील प्रचारसभेमुळे सामान्य खारघरवासीय आनंदी झाले आहेत. निवडणुकीचा निकाल लागायचा तो लागेल मात्र काही प्रमाणात वसाहतीमध्ये मोठ्या प्रमाणात रात्रीचा दिवस करुन स्वच्छता केली जात आहे.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
Raj Thackeray on Maharashtra Election 2024
Raj Thackeray : निवडणुकीच्या निकालानंतर राज ठाकरेंनी पहिल्यांदाच…

हेही वाचा – २५० मतदारांच्या नावांचा घोळ; कोपरखैरणेत नावे वगळणे, भलत्या मतदान केंद्रात नाव गेल्याचे प्रकार, तक्रार दाखल

रस्त्यावरील खड्डे जाणवू नये म्हणून रस्त्याचे डांबरीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. पाचशे मोठ्या बसगाड्या आणि दिड हजाराहून अधिक हलकी वाहने भाजप व महायुतीच्या कार्यकर्त्यांना घेऊन खारघरमध्ये दाखल होऊ लागली आहेत. तीन मोठे वाहनतळ मोकळी जागा स्वच्छ करुन नियोजन केले आहे. पेठपाडा मेट्रोस्थानकाच्या परिसरातच ही वाहनतळे आहेत. वाहनतळ आणि वाहतूक व्यवस्थेच्या नियोजनासाठी पनवेल प्रादेशिक परिवहन विभागाचे ५० हून अधिक अधिकारी येथे तैनात आहेत. १२०० हून अधिक पोलीस कर्मचारी व अधिकारी वसाहतीमध्ये प्रत्येक चौकांमध्ये सभेठिकाणी कसे जावे याचे मार्गदर्शन करत आहेत. 

हेही वाचा – पनवेल : प्रवाशांच्या समस्यांचा मुद्दा प्रचारातून गायब, रिक्षाचालकांकडून प्रवाशांची लूट, असुरक्षित प्रवासाबाबत सर्वपक्षीय नेते गप्पच

मागील अनेक वर्षांपासून खारघर उपनगरातील पेठपाडा ते सेंट्रलपार्क या दोन मेट्रो स्थानकादरम्यान वाहनाने पोहचण्यासाठी रस्ता नव्हता. पंतप्रधान मोदी यांच्या गुरुवारच्या प्रचारसभेमुळे रातोरात येथे तात्पुरता वाहने जाण्यासाठी बनवून त्यावरुन वाहतूक सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे खारघरच्या हलके वाहनचालक आणि दुचाकीस्वारांनी पंतप्रधान मोदी यांच्या दौऱ्याचे स्वागत केले आहे. या दौऱ्यामुळे अनेक वर्षांचा प्रश्न मार्गी लागल्याची भावना खारघरवासीय व्यक्त करत आहेत.

Story img Loader