नवी मुंबई : ऐरोली विधानसभा मतदारसंघातील कोपरखैरणे सेक्टर-८ येथील यादी क्रमांक ३३८ आणि ३४० मधील सुमारे २५० मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत. तसेच ऐरोली, घणसोली तसेच कोपरखैरणे सेक्टर १५ सेक्टर २ सेक्टर २३ सेक्टर १९ येथील मतदारयादीत नावांचा समावेश करण्यात आला आहे. यातील सर्व मतदारांसाठी सेक्टर ८ येथील रा. फ. नाईक विद्यालय हे केंद्र आहे.

कोपरखैरणे सेक्टर आठ येथील शेकडो मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत. लोकसभेत ज्या ठिकाणी मतदान केले त्याऐवजी अन्यत्र नावे आल्याने मतदार संभ्रमावस्थेत आहेत. याबाबत निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. मात्र आता एवढ्या उशिरा नावे पुनर्स्थापित होणे शक्य नसल्याची शंका व्यक्त केली जात आहे.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
eknath shinde
Eknath Shinde: एकनाथ शिंदे विरोधी पक्ष नेते? ‘दाल…
What is NOTA in Elections and What Happens When NOTA gets Most Votes
NOTA in Elections : NOTA खरंच महत्त्वाचे आहे का? सर्वाधिक मते नोटाला मिळाले तर काय होईल?

हेही वाचा – उरण : रानडुकरांमुळे भातशेतीचे नुकसान, वन, कृषी विभागाचे दुर्लक्ष; शेतीची राखण करण्याची शेतकऱ्यांवर वेळ

नवी मुंबईतील मतदान टक्केवारी वाढवण्याचे काम पालिका प्रशासनाला निवडणूक आयोगाने दिले आहे. विविध उपक्रम राबवत असून त्यासाठी मोठ्या प्रमाणात निधीचा वापर होत आहे. मात्र नेहमीच्या मतदार यादीत नाव नसणे, दूर कुठल्या तरी मतदान केंद्रात नाव टाकण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे.

मतदान टक्केवारी वाढवण्याचे काम मनपा प्रशासनाला निवडणूक आयोगाने दिले आहे. नवी मुंबई महापालिका विविध उपक्रम राबवत असून त्यासाठी मोठ्या प्रमाणात निधीचा वापर होत आहे. परंतु, नेहमीच्या मतदार यादीत नाव नसणे, अचानक दूर कुठल्या तरी मतदान केंद्रात नाव टाकण्यात येणे अशा अनेक कारणांनी इच्छा असूनही मतदान करता येत नाही. त्यात सामान्य मतदारांना तांत्रिक अडचणी सोडवता येत नाहीत. मतदानाची तारीख जवळ आल्याने नावांचा गोंधळ दुरुस्त करणे शक्य नसल्याचे सांगिल्याचे तक्रारदार रवींद्र म्हात्रे यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.

मतदान केंद्र बदल वा अन्य यासाठी अर्ज करून मतदार स्वत:ची कागदपत्रे देत नाही तोपर्यंत त्यांची नावे अन्यत्र वळवता येत नाहीत. एखाद्या राजकीय व्यक्तीने एकत्रित असे केलेले असू शकते. याबाबत पाहणी करून योग्य तो निर्णय घेतला जाईल. – सुचिता भिकाणे, निवडणूक अधिकारी, ऐरोली

हेही वाचा – नवी मुंबई : मतदान वाढीसाठी बिल्डरांनाही आवाहन

पहिलीच संधी असल्याने लोकसभेला रा.फ. नाईक महाविद्यालय मतदान केंद्रात उत्साहात मतदान केले. मात्र आता विधानसभा निवडणुकीच्या वेळी माझे नाव मतदार यादीत आढळून आले नाही. शोधाशोध केली असता ते घणसोलीतील यादीत गेल्याचे दिसून आले आहे. आता नक्की काय करावे याची मला माहिती नाही. – आकाश कटमनी, मतदार

Story img Loader