मुंबई कृषी उत्पन्न बाजारात समितीत डिसेंबर-जानेवारी पासूनच द्राक्ष दाखल होण्यास सुरुवात होते. परंतु यंदा अवकाळी पावसाने हंगामाला उशिराने सुरुवात झाली आहे. आता बाजारात मोठ्या प्रमाणावर आवक वाढली असून ८२० क्विंटल द्राक्षे दाखल झाले आहे. आवक वाढली असली तरी मागणी रोडावली आहे.
नोव्हेंबर महिन्यांत द्राक्ष फळाच्या आवक सुरू होते. तसेच जानेवारी मध्ये द्राक्षांचे प्रमाण अधिक वाढते. साधारण १५ नोव्हेंबर-डिसेंबर नंतर द्राक्षची अधिक आवक सुरू होत असून एप्रिल पर्यत हंगाम असतो. सध्या बाजारात ५०-६० टेम्पो आवक असून बुधवारी बाजारात ८२० क्विंटल द्राक्ष दाखल झाले आहेत. एपीएमसीत बाजारात नाशिक, तासगाव, सातारा आणि सांगली मधुन अधिक आवक होत आहे. घाऊक बाजारात सफेद द्राक्षाच्या १० किलो पेटीला ५०० ते ६०० रुपये तर प्रतिकिलो ४० ते ६०रुपये बाजारभाव आहे.