नवी मुंबई: सीबीडी सेक्टर आठ येथील एका छोट्या गल्लीत मनपाचा डंपर चालवत असताना चालकाने सायकल वर शाळेत जाणाऱ्या एका १२ वर्षीय मुलाला धडक दिली. या धडकेत त्याचा जागीच मृत्यू झाला. भिंत आणि डंपर याच्या मध्ये जागा नसतानाही डंपर चालकाने गाडी दामटल्याने हा अपघात झाला. अपघात होताच डंपर चालक पळून गेला. त्याला अटक केल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका पालकांनी घेत सीबीडी पोलीस ठाण्यासमोर ठिय्या मांडला होता. 

बुधवारी सकाळी सीबीडी येथील पीपल्स एजुकेशन सोसायटीच्या  इंग्रजी माध्यमासच्या शाळेत इय्यता सहावीत शिकणारा विद्यार्थी शिवम भट हा शिकवणी संपल्यावर वडिलांच्या कार्यालयात गेला. सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास तेथून परत घरी जात होता.  सीबीडी सेक्टर ८ येथील एका चिंचोळ्या गल्लीतून जात असताना समोरून एक डंपर आला. भट याच्या डावीकडे एक भिंत असल्याने तो डंपरच्या अधिक बाजूला जाऊ शकत नव्हता. अशा वेळी डंपर चालकाने सावधानतेने डंपर चालवण्याऐवजी परिस्थिती कडे दुर्लक्ष करून डंपर चालविल्याने झालेल्या अपघातात शिवम याचा मृत्यू झाला. 

अपघात होताच डंपर चालकाने पळ काढला. तर शिवम याला परिसरातील लोकांनी रुग्णालयात दाखल केले. तेथेच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. मात्र डंपर चालकाच्या विरोधात गुन्हा नोंद झाला नव्हता. मुलाचे काही नातेवाईक शाळेचे अनेक लोक व परिसरातील लोकांनी डंपर चालकाला अटक केल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही. असा पवित्रा घेतला होता. रात्री उशीरा डंपर चालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला.  

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

डंपर चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याचा शोध पोलीस घेत आहेत. पालकांची समजूत काढण्यात आलेली आहे. अशी माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त मयूर भुजबळ यांनी दिली.