नवी मुंबई : मुंबई कृषि उत्पन्न कांदा बटाटा बाजारात दाखल झालेला बटाटा सडत असून तो कचऱ्यात फेकण्याची नामुष्की ओढवली आहे. एपीएमसीत उत्तर प्रदेशमधून बटाटा दाखल होता असून वजन काटा बंद असल्याने बाजारात वेळेवर गाडी विक्रीसाठी दाखल होत नाही, त्यामुळे बटाटा आणखीन खराब होत असून सडत आहे. सोमवारपासून तब्बल ३०० टनाहून अधिक बटाटा सडला असून तो कचराभूमीवर फेकण्याची वेळ एपीएमसी ओढवली आहे.

एपीएमसीत दररोज बटाट्याच्या ३० ते ४० गाड्या दाखल होत आहेत. परराज्यातील उत्तर प्रदेशातून बटाटा दाखल होत आहे. परंतु पावसामुळे जागेवरून ओला बटाटा भरला जात आहे. त्यामुळे त्या ठिकाणाहून बाजारात बटाटा येण्यासाठी दोन-तीन दिवसांचा कालावधी जात आहे. पुन्हा एपीएमसी बाजारातील १५-२०दिवसांपासून वजन काटाबंद असल्याने बाहेर वजन करून बाजारात गाडी विक्रीसाठी दाखल होण्यासाठी उशीर होत आहे. परिणामी बटाट्याच्या विक्रीला विलंब होत असल्याने बटाटा मोठ्या प्रमाणावर खराब होत आहे. तर सोमवारपासून ही परिस्थिती अधिक बिकट होत असून बुधवारी बाजारात मोठया प्रमाणात बटाटा सडला होता. हा सडलेला बटाटा बाजारात सडत पडत नसल्याने मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी पसरली होती. त्यामुळे हा सडलेला ३०० टन ते ३५० टन बटाटा तुर्भे येथील कचराभूमीवर फेकण्यात आला आहे.

survey of the cluster scheme was halted due to public outrage
नागरिकांच्या रोषामुळे क्लस्टर योजनेचे सर्व्हेक्षण थांबवले
bigg boss 18 advocate Gunaratna sadavarte entry with pet donkey max in salman khan show watch promo
Bigg Boss 18 : गुणरत्न सदावर्तेंची शोमध्ये एन्ट्री,…
Will there be high sowing in Rabi season this year
यंदाच्या रब्बी हंगामात उच्चांकी पेरण्या होणार?
st bus maharashtra, buses, ST, ST corporation,
आनंदवार्ता… ‘एसटी’च्या ताफ्यात आणखी २,५०० बसगाड्या येणार
no decision has been taken on mechanism to fill pothole in City Post premises after 24 hours
‘खड्ड्यांत’ गेलेल्या पुण्यात खड्डा बुजविण्यावरून ‘खड्डाखड्डी’!
Library at CBD Police Station
सीबीडी पोलीस ठाण्यात अभ्यासिका
adulterated edible oil, Food and Drug Administration,
मुंबई : भेसळयुक्त खाद्यतेल, मिरची पावडर, दुधाची विक्री करणाऱ्यांवर कारवाई; सणासुदीनिमित्त अन्न व औषध प्रशासनाची मोहीम
after Ganeshotsav is over there is a rush to buy fish
उरण : गणेशोत्सव संपताच मासळी खरेदीसाठी गर्दी

हेही वाचा : पनवेल: पंधरा दिवसांपूर्वी सुरक्षित असलेला फलक पडलाच कसा

सर्वोत्तम दर्जाच्या बटाट्याची दरवाढ

एपीएमसी बाजारात उत्तर प्रदेशमधून बटाटा दाखल होत असून त्या ठिकाणाहून ओला बटाटा गाडीमध्ये भरला जात आहे. तेथून एपीएमसी बटाटा दाखल होण्यासाठी २ते ३ दिवस जात आहेत. तर दुसरीकडे एपीएमसीचा वजन काटा बंद असल्याने त्याच्या अभावी विक्रीसाठी बटाटा दाखल होण्यास उशीर होत आहे. या दोन्ही कारणांमुळे सध्या मोठ्या प्रमाणावर बटाटा सडत असून तो कचऱ्यात फेकावा लागत आहे. त्यामुळे बाजारात अवघा २० ते ३० टक्के उत्तम दर्जाचा बटाटा उपलब्ध आहे. परिणामी बाजारात चांगल्या बटाट्याला जास्त मागणी असल्याने दर वधारले आहेत. आधी प्रतिकिलो २२ते २५रुपयांनी उपलब्ध असलेला बटाटा आता २६ ते ३०रुपयांनी विक्री होत आहे.