नवी मुंबई : सीवूड्स येथील टी. एस. चाणक्य सागरी प्रशिक्षण संस्थेच्या मागे असलेला चाणक्य तलाव हे मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाने संरक्षित क्षेत्र आहे . परंतु, पालिकेच्या विकास आराखड्यात कांदळवन आरक्षण हटवण्यात आले असून प्रशासकीय संस्थांवर पर्यावरणप्रेमींमध्ये प्रचंड संताप असून चाणक्य तलावाजवळ नव्याने कांदळवनावर घाला घातला आहे. त्यात अनेक कांदळवन तोडून टाकण्यात आलेले आहेत. सातत्याने या परिसरात कांदळवनाला लक्ष्य केले जात असून कांदळवन वाचवण्यासाठी व पाणथळी वाचवण्यासाठी पर्यावरण प्रेमींनी शनिवारी सकाळी आंदोलन केले.

नवी मुंबई शहराला फ्लेमिंगो सिटी संबोधण्यात येत असून शहरभर नवी मुंबई महापालिकेच्या माध्यमातून फ्लेमिंगोच्या प्रतिकृती लावण्यात आलेल्या आहेत. एकीकडे नवी मुंबईला फ्लेमिंगो सिटी संबोधले जात असताना दुसरीकडे याच फ्लेमिंगोंचा अधिवास असलेल्या पाणथळी नसल्याचे दाखवण्यात आल्याने महापालिका प्रशासन सिडको व राज्य शासन यांच्या विरोधात पर्यावरण प्रेमींमध्ये संताप आहे. १४.७४ हेक्टर क्षेत्र व्यापलेला चाणक्य तलाव आणि त्याच्या आजूबाजूचे खारफुटीचे क्षेत्र सिडकोच्या अधिपत्याखाली येते. मुंबई उच्च न्यायालयाने सिडकोला आपल्या ताब्यातील सर्व खारफुटी प्रदेश वनविभागाच्या कांदळवन कक्षाकडे हस्तांतरित करण्याचे निर्देश देऊनही, सिडकोने जाणीवपूर्वक संपूर्ण ठाणे खाडी हस्तांतरण करण्यास टाळाटाळ करत असून खासगी विकासकांच्या घशात घालून करोडोंचा फायदा मिळवण्याच्या प्रकारामुळे सिडकोचाच चाणक्य तलाव बुजवण्याचा छुपा प्रकार असल्याचा आरोप निसर्गप्रेमींनी केला आहे.

trees cut, Metro-3,
मेट्रो-३ प्रकल्पासाठी तोडलेल्या झाडांच्या पुनर्रोपणाचे प्रकरण : कामातील प्रामाणिकपणावर उच्च न्यायालयाच्या विशेष समितीचे बोट
port at vadhvan, vadhvan,
वाढवण येथील पर्यावरणस्नेही बंदराचा मार्ग मोकळा
mumbai, charkop, Architect s Attempt to fraud , fungible carpet area in MHADA Housing, MHADA Housing Societies charkop, redevlopment of mhada socieities, mhada society charkop, chrkop news,
चारकोपमधील म्हाडा पुनर्विकासात फंजीबल चटईक्षेत्रफळाचा घोटाळा, अधिकाऱ्याच्या दक्षतेमुळे अनर्थ टळला!
flamingo, Solar lights, Navi Mumbai ,
फ्लेमिंगो क्षेत्रात सौरदिवे! पर्यावरणवाद्यांच्या तक्रारींनंतर नवी मुंबई महापालिकेची धावाधाव

हेही वाचा : उरण नंतर आता नवी मुंबईत मोठा चिटफंड घोटाळा, ३०० गुंतवणूकदारांची २६ कोटींची फसवणूक; व्याप्ती वाढण्याची शक्यता

नवी मुंबईतील एनआरआय संकुलाला लागून असलेला एक मोठा पट्टा राज्य शासनाने सिडकोला विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून दिला आहे. त्यानंतर येथे एका मोठ्या बांधकाम व्यावसायिकाचे काम चालू झाले आहे. याच चाणक्य परिसरात वारंवार छुप्या पध्दतीने खारफुटी तोडून टाकण्याचे प्रकार सुरु आहेत. तर दुसरीकडे पालिकेनेही या जमिनीवर टाकलेले पाणथळ आरक्षण हटवल्याने आधीच पर्यावरणप्रेमींमध्ये याबाबत संताप असतानाच सातत्याने खासगी विकासकाच्या माध्यमातूनच वारंवार छुप्या पद्दतीने खारफुटी तोडण्याचे प्रकार होत आहेत. मागील अनेक महिन्यांपासून पर्यावरणप्रेमी याच परिसरात दर रविवारी सातत्याने आंदोलन करत आहेत. परंतु खारफुटींच्या कतलीच्या घटना सातत्याने होऊ लागल्याने आज शनिवारी सकाळी आंदोलन करण्यात आल्याची माहिती पर्यावरण प्रेमी यांनी लोकसत्ताला दिली आहे.

हेही वाचा : नवी मुंबई ही भविष्यातील जागतिक क्रीडानगरी, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक सिंघल यांचे प्रतिपादन

उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे युवानेते व माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनीही नवी मुंबईत येऊन सिडकोच्या व राज्य शासनाच्या तसेच नवी मुंबई महापालिकेच्या भूमिकेबद्दल तीव्र संताप व्यक्त केला आहे. एकीकडे पाणथळीच्या जागा खाजगी विकासकाला देण्याचा डाव प्रशासनाचा असल्याने हा प्रकार होत असल्याचा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला आहे. राज्य शासनाकडूनही याबाबत खारफुटीक्षेत्राबाबत पाहणी करण्यात आली आहे. परंतू एकीकडे खारफुटी वाचवण्यासाठी तसेच फ्लेमिंगोचा अधिवास वाचवण्यासाठी पर्यावरणप्रेमी नागरीकांमध्ये संताप आहे. आज करण्यात आलेल्या आंदोलनात अलर्ट सिटीजन फोरम एन्व्हायरमेंट लाईफ फाउंडेशन, संस्कार फाउंडेशन, प्रकल्पग्रस्त पालक संस्था यांनी आंदोलनात सहभाग घेतला होता.

हेही वाचा : नवी मुंबई : चिमुरडीच्या अपहरणप्रकरणी एकास अटक, एक फरार

खारफुटी नष्ट करण्यासाठी खारफुटीला केमिकल टाकून नष्ट करण्याचा प्रयत्न

नवी मुंबई शहर फ्लेमिंगो सिटी असल्याचा उल्लेख वारंवार महापालिकेकडून करण्यात येतो. तर दुसरीकडे पालिका व सिडको कांदळवनाच्या कत्तलिकडे दुर्लक्ष करते. त्यामुळे प्रशासनच बिल्डर धार्जिणेअसून त्यांच्या विरोधात व कांदळवन वाचवण्यासाठी आणि फ्लेमिंगोचा अधिवास टिकवण्यासाठी आज आंदोलन करण्यात आले. एकीकडे खारफुटी नष्ट करण्याचा प्रयत्न केला जात असताना या ठिकाणी खारफुटी समूळ नष्ट होण्यासाठी केमिकल टाकण्यात येत असल्याचा प्रकार करण्यात येत आहे. ही अतिशय गंभीर बाब असून सिडको व पालिका प्रशासनाने याबाबत तात्काळ कार्यवाही करणे आवश्यक आहे. याच परिसरात एका विकासकाचा बोर्ड ही लावण्यात आलेला असून खारफुटी नष्ट करण्यासाठी हाच विकासक प्रयत्न करत असल्याची शंका आहे.

सुनील अग्रवाल, पर्यावरणप्रेमी