नवी मुंबई : नवी मुंबईतील घणसोली स्थित एन एम एम टी डेपो समोरील मोकळ्या मैदानात मोठ्या प्रमाणात गवत असते. सध्या हे गवत वाळलेले असून त्याला आज मोठ्या प्रमाणात आग लागली होती. या आगीमुळे दूरपर्यंत काळा धूर पसरला होता. अग्निशमन दलाने येऊन आग विझवली. मात्र निर्मनुष्य अशा ठिकाणी आग लावतो कोण आणि का हे गूढ मात्र कायम आहे. 

हेही वाचा : नैनामध्ये पाऊल ठेवू देणार नाही ? अतिक्रमण मोहीम पथक माघारी, १०० पेक्षा अधिक लोकांवर गुन्हे

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दोन दिवसांपूर्वी घणसोलीतील एन एम एम टी डेपो समोरील परिसरात असणाऱ्या गवताला आग लागली होती. मात्र काही वेळात आग आपोआप विझलीही. मात्र आज चारच्या सुमारास याच ठिकाणी गवताला एवढी मोठी आग लागली कि अग्निशमन दलास यावे लागले. हा परिसर एका बाजूला रहिवासी इमारती एनएमएमटी घणसोली डेपो तर समोरील बाजू पूर्ण निर्मनुष्य असून गवत माजले आहे. अशा ठिकाणी आग कोण आणि का लावतो हे मात्र कोडे अग्निशमन दलासही पडले आहे. अशा प्रकारे सानपाडा, एनआरआय, वाशी, खाडी किनाऱ्यालासुद्धा आग लावली जात होती. या ठिकाणी तर मनुष्य येणे सुद्धा अवघड असून कांदळवन तुडवून येथे येऊन आग का लावली जाते हे जसे कोडे होते तसेच घणसोलीत या ठिकाणी का आग लावली जाती हे कोडे आहे. याबाबत घणसोली विभाग कार्यालयातील अधिकाऱ्यांनी आगीचे घटनेला दुजोरा दिला आहे.