नवी मुंबई : चोर हाती लागल्यावर अनेकदा त्याला बेदम मारहाण केली जाते. मात्र असे करणे कायद्याचे उल्लंघन आहे. अशाच प्रकारे संशयित चोराला मारहाण करणारे दुकान मालक आणि त्याच्या नोकरांची रवानगी पोलीस कोठडीत करण्यात आली आहे. या प्रकरणी संशयित चोराने दिलेल्या तक्रारीवरून मालक व अन्य त्याच्या नोकराच्या विरोधात आणि चोरी केल्या प्रकरणी दुकान मालकाने दिलेल्या तक्रारीनुसार संशयित चोरावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

एपीएमसी मध्ये स्वस्तिक ट्रेडर्स नावाचे दुकान असून इलायची सह अन्य पदार्थांचा ठोक व्यवसाय येथे केला जातो. दुकान मालक रोनक भानुशाली हे आहेत तर त्यांच्या कडे संजय चौधरी, लालाजी पगी , वीरेंद्रकुमार गौतम,राकेश पटेल  हे काम करतात तर योगेश भानुशाली आणि करण भानुशाली हे नातेवाईक व्यवसायात मदत करतात. २७ तारखेला दुकानात इलायचीचे प्रत्येकी एक किलो वजनाचे २३ पुढे ज्याचे मूल्य ५१ हजार ५२० आहे ते आढळून आले नाही. हे पुडे राकेश पटेल याने चोरी केल्याचा संशय दुकानातील कामगार आणि मालक भानुशाली यांना आला. त्यामुळे सर्वांनी मिळून पटेल याला काठीने हाताने असे जमेल तसे बेदम मारहाण केली. त्याला अक्षरशः शूज चाटण्यास लावण्यास लावले एवढ्यावर राग शांत झाला नाही तर त्यात तो जखमी असतानाही दुकानात रात्रीभर डांबून ठेवले. आणि दुसऱ्या दिवशी दुपारी दोनच्या सुमारास त्याला घेऊन सर्व एपीएमसी पोलीस ठाण्यात दाखल झाले. त्यावेळी त्याची हालत पाहून वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय शिंदे यांनी पटेल याला उपचारार्थ वाशीतील प्रथम संदर्भ रुग्णालयात दाखल केले.

हेही वाचा…निम्म्या नवी मुंबई शहरावर सीसीटीव्हिंची नजर नाहीच

चोरीच्या संशयावरून बेदम मारहाण केल्या प्रकरणी पटेल याने दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा नोंद करीत दुकान मालक रोनक भानुशाली हे आहेत तर त्यांच्या कडे संजय चौधरी, लालाजी पगी , वीरेंद्रकुमार गौतम यांना तात्काळ अटक करण्यात आली असून त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी न्यायालयाने फर्मावली आहे. तर दुसरीकडे चोरी केल्या प्रकरणी रोनक भानुशाली यांनी दिलेल्या तक्रारी वरून राकेश पटेल यांच्या विरोधात चोरी केल्या प्रकरणी गुन्हा नोंद केला आहे. 

हेही वाचा…डिझेल बसगाड्यांची दुरवस्था, एनएमएमटीच्या डिझेलवरील बसगाड्यांची तात्पुरती डागडुजी करण्यावर भर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याबाबत अधिक माहिती देताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय शिंदे यांनी सांगितले कि चोरी करणे गुन्हा असला तरी  एखादा संशयित आरोपी सापडला तर त्याला मारहाण करणे,  डांबून ठेवणे,  हे कायद्याच्या विरोधात आहे. त्यामुळे दोन्ही कडून दिलेल्या तक्रारी वरून तसेच परिस्थिती पाहून गुन्हा नोंद करण्यात आला आहे.