उरण : उरण ते खारकोपर लोकलसाठी उभारण्यात आलेल्या रेल्वे स्थानक परिसरात येथील तरुण सकाळी कसरती, सायकलिंग आणि मॉर्निंग वॉक करीत आहेत. त्याचप्रमाणे अनेक नागरिक हे सकाळी व सायंकाळी फलाटावर चालण्यासाठी येत आहेत. स्थानकाच्या परिसरातील हिरवळ, मोकळे रस्ते आणि आल्हाददायक वातावरणाचा लाभ घेत आहेत. मात्र उरणच्या नागरिकांना ही सेवा सुरू होण्याची प्रतीक्षा आहे.

हेही वाचा : वाशी खाडी पुलावरील वाहतूक कोंडीतून लवकरच सुटका; सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे यांचे आश्वासन

उरण पनवेल मार्गावर उरणचे रेल्वे स्थानक आहे. या स्थानकाच्या परीसरात रुंद रस्ते, हिरवळ आणि वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. त्यामुळे परिसर निसर्गरम्य बनविण्यात आला आहे. त्याचप्रमाणे समोरच द्रोणागिरी डोंगराचा परिसर नजरेत पडतो. या स्थानकाच्या परिसरात उरणमधील तरुण सकाळी व्यायाम, मॉर्निंग वॉक व सायकलिंगसाठी येत आहेत. मात्र हे स्थानक कधी सुरू होणार याची उरणमधील नागरिक आतुरतेने वाट पाहत आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.