पनवेल : खारघर वसाहतीमधील सेक्टर १६ मधील वास्तुविहार सेलिब्रेशन या रहिवाशी संकुलामध्ये रविवारी पहाटे साडेचार वाजता एक अनोळखी प्राण्याची हालचाल एका जागरुक नागरिकाने पाहील्यानंतर या प्राण्याविषयी माहिती देण्यासाठी मोबाईल फोनच्या कॅमेरामध्ये या प्राण्याच्या वावर असल्याचे चित्रीकरण केले. हा प्राणी नेमका तरस, लांडगा किंवा कोल्हा असा प्रश्न सध्या पनवेलच्या वन विभागाच्या अधिकाऱ्यांना पडला आहे. वन विभागाचे अधिकारी ज्ञानेश्वर सोनावणे यांनी त्यांचे पथक सोमवारी या परिसरात तैनात केले आहे.

अनोळखी प्राणी नागरी वस्तीमध्ये दिसल्याने रहिवाशी भीतीच्या सावटाखाली आहेत. तरस हा प्राणी नागरिकांवर हल्ला करु शकतो अशी भिती नागरिकांमध्ये आहे.  खारघर, कामोठे व कळंबोली या परिसरात मोठ्या प्रमाणात पाणथळ होती. ३० वर्षांपूर्वी कळंबोली व कामोठे परिसरालगत खाडीक्षेत्र मोठ्या प्रमाणात असल्याने तेथे कोल्ह्यांचा ओरडण्याचा आवाज नागरिकांना ऐकु येत होता. अनेक रहिवाशांनी या परिसरात मोठ्या प्रमाणात कोल्हे पाहिले देखील आहेत. वास्तुविहार सेलीब्रेशन या सोसायटींच्या मागील बाजूस खाडीतील खारफुटीचे जंगल आहे. याच परिसरात सध्या खाडीक्षेत्र गोठवून तेथे प्रदूषणासाठी खाडीच्या खालून वाहिनी टाकण्याचे काम सुरू आहे.

हेही वाचा : पनवेल : पालक ओरडतील या भीतीने विद्यार्थीनीचा आत्महत्येचा प्रयत्न

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

खाडीक्षेत्र गोठवून स्फोटकाने भूगर्भात स्फोट करुन ही वाहिनी भूमिगत करण्याचे काम मागील महिन्यापासून जोरदार सूरु आहे. पर्यावरण विभागाने दिलेल्या परवानगीने हे काम सूरु असले तरी खाडी क्षेत्र गोठविल्याने येथील जलचरांचे काय याबाबत कोणतीही काळजी घेतली गेली नाही असा आरोप पर्यावरणप्रेमींकडून केला जात आहे. भाजपचे या परिसरातील पदाधिकारी समीर कदम यांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन एका लघुसंदेशाव्दारे केले आहे. वन विभागाचे अधिकारी सोनावणे यांनी चित्रिकऱणात दिसणारा तो प्राणी तरस नसल्याचे स्पष्ट करताना रहिवाशांनी घाबरुन न जाता, वन विभागाने त्या प्राणाच्या शोधार्थ पथक नेमल्याची माहिती दिली.