उरण : अनेक वर्षे पाण्यासाठी वणवण करणाऱ्या करंजा कोंढरीमध्ये पाणीटंचाईचा सामना करावा लागत असून आता हे पाणी दूषितही झाले आहे. त्यातूनही १५ ते २० दिवस ग्रामस्थांना पाण्याची प्रतीक्षा करावी लागत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा संताप व्यक्त केला जात आहे. तर आणखी किती वर्षे पाणीटंचाई सहन करायची असा सवाल केला जात आहे. करंजा कोंढरी आणि परिसर हा तालुक्यातील सर्वात मोठ्या चाणजे ग्रामपंचायतीचा भाग आहे. जवळपास ३० हजार लोकवस्ती आहे. कोंढरी परिसरात दहा हजारांपेक्षा अधिक लोकवस्ती आहे.

हेही वाचा : उरण : चिरनेर शेतकऱ्यांनी बांधले दोन वनराई बंधारे, पावसाळ्यानंतरच्या पिकांना मिळणार पाण्याचा ओलावा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या विभागाला पाणीपुरवठा करण्यासाठी कोट्यवधी रुपयांच्या योजना राबविण्यात आल्या आहेत. मात्र तरीही येथील पाण्याचा प्रश्न न सुटल्याने करंजा येथील ग्रामस्थांनी उरण तहसील कार्यालयावर मोर्चा काढून आक्रोश केला होता. त्यानंतर काही महिने-आठवड्यात सात दिवसांनी पाणी येऊ लागले होते. मात्र पुन्हा एकदा यामध्ये वाढ झाली आहे. मागील पंधरा दिवसांपासून पाण्याची वाट पाहत असल्याची माहिती कोंढरी येथील विनायक पाटील यांनी दिली आहे. तसेच ग्रामपंचायतीने तातडीने पाणी प्रश्न सोडविण्याची मागणी केली
आहे.