नवी मुंबई : नवी मुंबईमध्ये डेंग्यू, मलेरियासारखे साथीचे आजार बळावत आहेत. मागील वर्षीच्या तुलनेत शहरात डेंग्यू संशयित रुग्णांमध्ये वाढ झाली आहे.

पावसाळा सुरू होताच नागरिकांमध्ये साथीच्या आजाराची लागण होते. शहरात नवीन बांधकामे सुरू आहेत. बांधकामासाठी वापरले जाणारे पाणी अनेक दिवस साठवून ठेवल्याने त्या ठिकाणीदेखील या साथीच्या रोगांची उत्पत्ती होणाऱ्या डासांच्या आळ्या तयार होत असतात. तसेच साठवणुकीच्या स्वच्छ पाण्यातही डास उत्पत्ती होत असते. घराअंतर्गत डास उत्पत्ती स्थाने शोध मोहीम राबविण्यात आली असून या मोहिमेअंतर्गत सप्टेंबरमध्ये २१७३९३ घरांना भेटी देऊन ४०४९२६ घराअंतर्गत डास उत्पत्ती स्थाने तपासण्यात आली. त्यामध्ये ११७९ स्थाने दूषित आढळून आली व ती नष्ट करण्यात आली. यामध्ये अ‍ॅनोफिलीस डास १५१ ठिकाणी तर ९६३ ठिकाणी एडिस आणि क्युलेक्सचे ६१ ठिकाणी असे ११७९ ठिकाणी डास उत्पत्ती आढळली आहे. यंदा डेंग्यू सदृश रुग्णांच्या संख्येत दुपटीने वाढ झाली आहे.

हेही वाचा – उरण-पनवेल मार्गावरून एसटी सुरू करण्यासाठी बोकडवीरा, फुंडे, डोंगरी व पाणजे गावातील महिलांचे धरणे आंदोलन

हेही वाचा – पनवेल : पाण्याविना कसे जगावे

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जानेवारी २०२२ ते सप्टेंबर २०२२ अखेरपर्यंत मलेरियाचे ६९ रुग्ण, तर सप्टेंबर २०२३ पर्यंत ७७ मलेरियाचे रुग्ण आढळले आहेत. मागील वर्षी डेंग्यूची लागण झालेले १० रुग्ण होते यंदा आतापर्यंत १० रुग्णांची नोंद पालिकेत आहे. मागील वर्षी सप्टेंबर २०२२ पर्यंत ४६७ डेंग्यू संशयित रुग्ण आढळले होते, यंदा मात्र डेंगूसदृश्य रुग्णात वाढ झाली असून सप्टेंबर २०२३ पर्यंत ९०० रुग्ण आढळले आहेत.