उरण : महाविकास आघाडीचा महत्त्वाचा घटक असलेल्या काँग्रेसला रायगड जिल्ह्यात एक जागाही न दिल्याने काँग्रेस पक्ष रुसला होता. मात्र महाविकास आघाडी आणि उमेदवारांमध्ये चर्चा झाल्यानंतर काँग्रेसचे कार्यकर्ते विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात सक्रिय झाले असल्याची माहिती रायगड जिल्हा काँग्रेसचे नेते महेंद्र घरत यांनी दिली आहे.

रायगड जिल्ह्यात काँग्रेस व शेतकरी कामगार पक्ष हे दोन पक्ष आणि त्यांच्यातील लढती होत होत्या. अनेकदा जिल्ह्याचे खासदार, आमदार निवडून आले आहेत. मात्र २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत रायगड जिल्ह्यात महाविकास आघाडीकडून काँग्रेसला एकही जागा न दिल्याने जिल्ह्यातील काँग्रेसचे कार्यकर्ते रुसले होते. त्यांनतर भर सभेत काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष महेंद्र घरत यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. तर जोपर्यंत महाविकास आघाडीचे उमेदवार येऊन काँग्रेस कार्यकर्त्यांशी चर्चा करून पुढील दिशा ठरवत नाहीत तोपर्यंत निवडणूक प्रचारात सक्रिय न होण्याची भूमिका घेतली होती.

हेही वाचा >>> पनवेलमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेत फूट

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

त्यानंतर उरण विधानसभा मतदारसंघातील शिवसेना ठाकरे गटाचे व महाविकास आघाडीचे उमेदवार मनोहर भोईर यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांची भेट घेत चर्चा केली. त्यामुळे महाविकास आघाडी मजबूत करण्यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांना प्रचारात उतरून जोमाने काम करण्याचे आदेश दिले असल्याची माहिती काँग्रेसचे नेते महेंद्र घरत यांनी दिली आहे.