राज्यात बंदी असलेला गुटखा विक्री प्रकरणी तुर्भे पोलिसांनी एका आरोपीस जेरबंद केले आहे . आरोपी कडून १ लाख २९ हजार ३६० रुपयांचा गुटका जप्त करण्यात आला आहे.

तौकीर निसारुद्दीन खान वय ३६ वर्ष राहणार खेरनेगाव हाजी कंपाऊंड रूम क्रमांक २ खैरणेगाव असे अटक आरोपीचे नाव आहे. पोलीस सह आयुक्त,नवी मुंबई यांनी नवी मुंबई पोलीस आयुक्तलयाचे  हद्दीमध्ये अवैधरित्या गुटखा व तंबाखूजन्य पदार्थ विक्री करणारे विक्रीसाठी जवळ बाळगणारे व त्याचा पुरवठा करणारे किंवा त्याची वाहतूक करणाऱ्या व्यक्तींवर कायदेशीर कारवाई करण्याची विशेष मोहीम राबविण्याचे आदेश दिलेले आहेत. या आदेशाची अंमलबजावणी करत असताना तुर्भे पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले संग्राम साबळे व पथकाने तुर्भे पोलीस हद्दीमध्ये  बुधवारी  गोपनीय माहिती द्वारे शर्मा पान टपरी ड्रम गल्ली तुर्भे स्टोअर, येथे छापा टाकला . 

हेही वाचा >>> देवगड हापुस नवी मुंबईत दाखल एपीएमसीत ३८ पेट्या दाखल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

छाप्यादरम्यान नमूद ठिकाणी गोवा पान मसाला, जी १ जर्दा, विमल पान मसाला व गुटखा,  रोकडा पान मसाला व गुटखा, डी एस पान मसाला व गुटखा,  राजनिवास पान मसाला व गुटखा,  असा एकूण १लाख २९ हजार३६० रुपये किमतीचा विक्री व पुरवठ्यासाठी मोठ्या प्रमाणात ठेवलेला गुटख्याचा साठा मिळून आला.सदर आरोपीविरुद्ध तुर्भे पोलीस ठाणे येथे खालीलप्रमाणे  गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अन्न सुरक्षा  आणि मानके अधिनियम २००६  सह अन्नसुरक्षा आयुक्त महाराष्ट्र राज्य अधिसूचना नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र दौंडकर यांनी दिली.