नवी मुंबई : नवी मुंबई महानगर पालिकेचे अधिकारी मनोहर गांगुर्डे यांनी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. हि घटना शनिवारी समोर आली असून कामोठे पोलीस अधिक तपास करीत आहेत. 

नवी मुंबई महानगर पालिकेच्या ऐरोली विभाग कार्यालयात प्रशासन अधिकारी म्हणून मनोहर गांगुर्डे हे कार्यरत होते. ते स्वतः कामोठे सेक्टर १६ येथील प्रेमअंबरसोसायटीत राहत होते. त्यांनी शुक्रवारी अपरात्री याच ठिकाणी गळफास घेत आत्महत्या केली आहे. ते दरवाजा उघडत नसल्याचे समोर आल्यावर या बाबत शेजाऱ्यांनी पोलिसांना माहिती दिल्यावर पोलिसांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केल्यावर त्यांनी गळफास घेतल्याचे दिसून आले.

हेही वाचा…गावाकडच्या दुबार मतदारांमुळे नवी मुंबईत खळबळ

u

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

त्यांना गृहकर्जाची नोटीस आल्याचे आढळून आले. त्यामुळे आर्थिक विवंचनेतून त्यांनी आत्महत्या केल्याचा प्रार्थमिक अंदाज कामोठे पोलिसांनी व्यक्त केला आहे. सदर आत्महत्या घटनेची नोंद शनिवारी करण्यात आली असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रियांका खरटमल या करीत आहेत. तर गेल्या काही दिवसापासून ते फार कोणाशी बोलत नव्हते तसेच काही दिवसापासून ये करायच्यात येत नव्हते त्यांच्या आत्महत्ये बाबत समाज मध्यातून माहिती मिळाली अशी माहिती मनपा अधिकाऱ्यांनी दिली