लोकसत्ता टीम

पनवेल: गायिका आर्या आंबेकर हीने गायलेल्या इशस्तवनाने शनिवारी पनवेलकरांच्या दिवाळी पहाट या सांस्कृतिक कार्यक्रमाची सुरुवात झाली. पनवेल महापालिका शहरातील वडाळे तलावाच्या काठाशी सुमारे सहा हजार पनवेलकरांच्या साक्षीने हा कार्यक्रम पार पडला. आर्याच्या सुमधूर गीत गायनाने पनवेलकरांची मने जिंकली. यावेळी आर्याच्या आवाजाप्रमाणे या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण अयोध्या येथे उभारले जात असलेल्या श्री राम मंदीराची प्रतिकृतीची आरास केल्यामुळे ठरले. पनवेल महापालिका या कार्यक्रमाचे आयोजक होते तर श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ हे सामाजिक संस्था या कार्यक्रमाचे प्रायोजक होते. यावेळी उपस्थितांना सकाळच्या न्याहरीसोबत दिवाळीचा फराळाची सोय प्रायोजकांनी केल्यामुळे या कार्यक्रमाची चर्चा शहरभर होती. भाजपच्या सलग्न असणा-या संस्थेकडे या कार्यक्रमाचे प्रायोजक पद गेल्याने लाखो रुपये खर्च करुन हा कार्यक्रम करण्यात आला. मात्र इतर राजकीय पक्षांच्या पदाधिका-यांनी या कार्यक्रमाकडे जाणे टाळले. भाजपने या कार्यक्रमाच्या आडून मतपेरणी केल्याचा आरोप इतर राजकीय पक्षांनी केला.

Shahu Vichar Darshan Padyatra, Rajarshi Chhatrapati Shahu Maharaj, Rajarshi Shahu Maharaj s Centenary Golden Jubilee , Centenary Golden Jubilee, Rajarshi Shahu Maharaj Kolhapur, Kolhapur, dr jai singh rao pawar,
शाहू विचार दर्शन पदयात्रेद्वारा विविधांगी कार्याचा जागर
lokrang article, Maharshi Vitthal Ramji Shinde, maharshi shinde centenary golden jubilee year, prarthana samaj, centenary golden jubilee year, bramho samaj, depressed classes mission society, Asprushata Niwaran Parishad, Bhartiya Asprushyatecha Prashna, work for depressed class, maharshi vitthal ramji shinde, 23 april 2024, reformer,
निमित्त : समर्पित समाजसुधारक
Babasaheb Ambedkar published Mooknayak lyrics by Vamandada Kardak in the voice of Hariharan
एका वर्तमानपत्राचे गाणे होताना…! ‘मूकनायक’ या वामनदादा कर्डकांचे गीत हरिहरन यांच्या आवाजात; आज प्रसारण
ठाणे : मुख्यमंत्र्यांच्या पायी सहभागामुळे स्वागत यात्रा विस्कळीत

मागील सहा वर्षांपासून श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळातर्फे पनवेलमध्ये दिवाळी पहाट हा कार्यक्रम केला जात होता. मात्र यंदा पनवेल पालिकेने पहिल्यांदा या कार्यक्रमासाठी आयोजक होण्याचे ठरविले. ठरल्याप्रमाणे पालिकेचा एकही रुपया खर्च न करता प्रायोजकांनी लाखो रुपये खर्च करुन भव्य दिवाळी पहाट हा कार्यक्रम यशस्वीरित्या आयोजित केला. यावेळी माजी खासदार रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, माजी सभागृहनेते परेश ठाकूर यांच्यासह भाजपचे पनवेलचे अनेक पदाधिकारी येथे मोठ्या संख्येने नागरिकांसोबत उपस्थित होते. पनवेल शहरासोबत इतर सिडको वसाहतींमधील नागरीक या कार्यक्रमासाठी पहाटे साडेपाच वाजल्यापासून उपस्थित होते.

आणखी वाचा-शशिकांत शिंदे यांच्यासह सात जणांच्या विरोधात गुन्हा दाखल, एपीएमसीतील शौचालय कंत्राट अनिमियता भोवली

सकाळच्या गारव्यात आर्या आंबेकर हीचा सूरेल सूरामुळे येथील वातावरण मंत्रमुग्ध झाले होते. या कार्यक्रमाचे निवेदन अभिजित कुलकर्णी यांनी केले. वाद्यवृंदावर अमेय ठाकूर, प्रथम कुलकर्णी, अनिल, झंकार कानडे, सागर, सिद्धार्थ कदम यांनी साथ दिली. आर्यासोबत सहगायक सौरभ यांनी विविध गाणी येथे सादर केली. गणनायका, श्रीरामाच्या पूजेसाठी आज अयोध्या सजली, विठ्ठला तू वेडा कुंभार, घेत असे जन्मा, कधी रे येशील तू, केव्हा तरी पहाटे, त्या फुलांचा गंध, तुला न कळले, येशील परतून, कितींदा नव्याने तुला आठवावे, केवड्याचे पान तू, हृदयात वाजे समथिंग, मन उधाण वाऱ्याचे आदी अशा प्रकारे अभंग, भक्तीगीते, भावगीते, चित्रपट गाणी विविध गीते सादर होताना पनवेलकर रसिक प्रेक्षकांनी गायकांना भरभरून दाद दिली. या कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.

या कार्यक्रमासाठी माजी खासदार रामशेठ ठाकूर, त्यांच्या पत्नी शकुंतला ठाकूर, आ. प्रशांत ठाकूर, नेत्रतज्ञ डॉ. सुहास हळदीपूरकर, महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर, भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, महानगरपालिकेचे उपायुक्त गणेश शेट्ये, माजी महापौर कविता चौतमोल, वर्षा ठाकूर, अर्चना ठाकूर, जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, माजी नगरसेविका चारुशीला घरत, पनवेल शहर अध्यक्ष अनिल भगत, माजी नगराध्यक्ष संदीप पाटील, माजी उपनगराध्यक्ष मदन कोळी, भाजपच्या महिला मोर्चाच्या शहर अध्यक्षा राजेश्री वावेकर, माजी नगरसेवक मनोहर म्हात्रे, अजय बहिरा, माजी नगरसेविका दर्शना भोईर, रुचिता लोंढे, वृषाली वाघमारे, मंदा भगत, भाजपचे तालुका सरचिटणीस राजेंद्र पाटील, सांस्कृतिक सेलचे जिल्हाध्यक्ष अभिषेक पटवर्धन, रायगड भूषण पंडित उमेश चौधरी, ज्येष्ठ कार्यकर्ते अजय कांडपिळे, भाजपचे कामोठे अध्यक्ष रवींद्र जोशी, भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, युवा मोर्चाचे शहर अध्यक्ष सुमित झुंझारराव, अमोघ ठाकूर, आदेश ठाकूर, चिन्मय समेळ, रोहित जगताप, अमोल खेर, अभिषेक भोपी, गणेश जगताप, वैभव बुवा, अक्षय सिंग, आदित्य उपाध्याय, यांच्यासह सामाजिक, शैक्षणिक, कला, संगीत, वैद्यकीय, विधी आदी क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.