Diwali Fire Tragedy in Vashi: शहरात दिवाळीनिमित्त उत्साहाचे वातावरण आहे. सर्वत्र आनंदाचे वातावरण असतानाच मंगळवारी मध्यरात्री वाशीतील सेक्टर १४ येथील एमजी कॉम्प्लेक्सच्या १० व्या मजल्यावर आग लागली. या आगीत एकूण ४ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. तसेच पनवेल परिसरात दिवाळीच्या उत्सवाचे सूर वातावरणात गुंजत असतानाच कामोठे येथे घडलेल्या दुर्दैवी घटनेने परिसर शोकमग्न झाला. सेक्टर ३६ मधील अंबे श्रद्धा इमारतीच्या तिसऱ्या आणि चौथ्या मजल्यावर सोमवारी पहाटे अचानक लागलेल्या आगीत आई आणि मुलगी जळून मृत्यूमुखी पडल्या.
दिवाळी सणाला सुरूवात झाली असून मोठ्या आनंदाने सर्वजण दिवे, पणत्या, आकाशकंदील तसेच विद्युत रोषणाईने घर सजावट करीत आहेत. तसेच अनेकजण फटाक्यांची आतषबाजी करत सण साजरा करत आहेत. दरम्यान मंगळवारी वाशीतील सेक्टर १४ तील एम जी कॉम्प्लेक्स मधील १० व्या मजल्यावर आग लागल्याची घटना घडली. ही आग शॉर्टसर्किटमुळे लागली असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे. १० व्या मजल्यावर लागलेली ही आग ११ व्या आणि १२ व्या मजल्यांपर्यंत पसरली. या आगीत १० व्या मजल्यावरील सदनिकेतील एका ज्येष्ठ महिलेचा मृत्यू झाला. तर, १२ व्या मजल्यावरील एकाच कुटुंबातील पती, पत्नी आणि त्यांच्या ६ वर्षाच्या मुलीचाही या घटनेत दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे शहरात हळहळ व्यक्त होत आहे.
पनवेलमध्ये आगीत होरपळून माय-लेकीचा मृत्यू
तसेच पनवेलमधील कामोठे येथे सोमवारी पहाटे सेक्टर ३६ मधील अंबे श्रद्धा इमारतीच्या तिसऱ्या आणि चौथ्या मजल्यावर आग लागली. अचानक लागलेल्या आगीत आई आणि मुलीचा होरपळून मृत्यू झाला. ही घटना ताजी असतानाच मंगळवारी मध्यरात्री वाशीतही ४ जणांचा आगीत होरपळून मृत्यू झाला. या घटनेमुळे अग्निशमन दलाकडून नागरिकांना खबरदारी बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अग्निशमन दलाच्या माहितीनुसार, पहाटे सुमारे पाच वाजून ४५ मिनिटांनी आगीची माहिती मिळताच केवळ पाच मिनिटांत कळंबोली येथील अग्निशमन पथक घटनास्थळी पोहोचले. जवानांनी तत्काळ घराचा दरवाजा तोडून मदतकार्य सुरू केले; मात्र घरातील दोन गॅस सिलेंडरचा स्फोट आणि दाट धूर यांमुळे आई व मुलगी यांचा घटनास्थळी होरपळून मृत्यू झाला.
पनवेल परिसरात दिवाळीच्या उत्सवाचे सूर वातावरणात गुंजत असतानाच कामोठे येथे घडलेल्या दुर्दैवी घटनेने परिसर शोकमग्न झाला. सेक्टर ३६ मधील अंबे श्रद्धा इमारतीच्या तिसऱ्या आणि चौथ्या मजल्यावर सोमवारी पहाटे अचानक लागलेल्या आगीत आई आणि मुलगी जळून मृत्यूमुखी पडल्या.
— LoksattaLive (@LoksattaLive) October 21, 2025
व्हिडीओ सौजन्य:… pic.twitter.com/wFRa2krK7W
या आगीत मृत्युमुखी पडलेल्यांची नावे रेखा सिसोदिया (वय ४५) आणि त्यांची मुलगी पायल सिसोदिया (१९) अशी आहेत. सिसोदिया कुटुंबातील इतर दोन सदस्य कामानिमित्त बाहेर गेल्याने ते बचावले. घटनेची माहिती मिळताच कामोठे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विमल बिडवे, आमदार प्रशांत ठाकूर आणि पनवेल महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त गणेश शेटे यांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थितीचा आढावा घेतला.
नवी मुंबई – शहरात दिवाळीनिमित्त उत्साहाचे वातावरण आहे. सर्वत्र आनंदाचे वातावरण असतानाच मंगळवारी मध्यरात्री वाशीतील सेक्टर १४ येथील एम जी कॉम्प्लेक्सच्या १० व्या मजल्यावर आग लागली. या आगीत एकूण ४ जणांचा दुर्देवी मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
— LoksattaLive (@LoksattaLive) October 21, 2025
फोटो व्हिडीओ -… pic.twitter.com/KRHn8nbD1J
आग कशामुळे लागली याचा तपास पोलिसांकडून सुरू असून प्राथमिक अंदाजानुसार गॅस गळतीमुळे ही दुर्घटना घडल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ऐन दिवाळीत या दुर्दैवी घटनेमुळे कामोठे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. परिसरातील नागरिकांनी शोकाकुल सिसोदिया कुटुंबाला सहानुभूती दर्शवली असून प्रशासनाकडून मदत देण्याची मागणी करण्यात येत आहे.