नवी मुंबई : माथाडी संघटनेचे नेते नरेंद्र पाटील यांनी फळ बाजारात बांगलादेशी नागरिक काम करत असून आता वादही होत आहेत. आपण नवी मुंबई पोलीस आयुक्तांना सांगून कारवाई करावी. माथाडी मंडळातील बनावट संघटनांची गुंडगिरी वाढली आहे, त्याला चाप बसावा, अशी मागणी नरेंद्र पाटील यांनी करत गृहमंत्र्यांच्या समोरच गृह विभागाचे वाभाडे काढले.

याशिवाय कामगारमंत्री आणि पणन मंत्री यांना वेळ नाही. त्यामुळे तुम्हीच बैठक घेऊन प्रश्न सोडवा असे सांगत घरचा आहेर दिला. माजी आमदार शशिकांत शिंदे यांचेही यावेळी भाषण झाले.

हे ही वाचा…नवी मुंबई : माथाडी राजकारणाला शिंदे गटाची बगल? मराठाबहुल मेळाव्यावर भाजपचा प्रभाव

यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलेल्या निवेदनात पुढील विभागवार मागण्या केल्या आहेत.

माथाडी कामगारांच्या विविध मागण्या

वाशीत ट्रक टर्मिनल जागेत सिडकोचा मोठा गृहप्रकल्प साकार होत आहे. त्यात अल्प उत्पन्न गटातील घरे माथाडी कामगारांना मिळावीत

शहरात माथाडी गृहप्रकल्प राबवावा, बाजार समिती शेजारी ट्रक टर्मिनल उभे करावे

कामगार खात्यांतर्गत प्रश्न माथाडी सल्लागार समिती पुनर्रचना करणे माथाडी मंडळ कार्यालयात माथाडी मुलांना प्राधान्य द्यावे

शासनाकडून आदर्श माथाडी कामगार पुरस्कार सुरू करावा

माथाडी कायद्यातील त्रुटी दूर करण्यासाठी समिती स्थापन करावी

रेल्वे यार्डात माथाडी कामगारांसाठी सुविधा द्याव्यात

मस्जिद बंदर वाहतूक नियमात बदल करणे

बनावट माथाडी संघटना, गुंड यांना आळा घालून योग्य ती कारवाई करावी

पणन खात्यांतर्गत प्रश्न बाजार समितीच्या अनुज्ञाप्तीधारक मापाडी/ तोलणार यांना बाजार समिती सेवेत घेणे

नाशिक माथाडी कामगारांचे प्रश्न सोडवणे

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

माथाडी कामगार सहकारी गृहनिर्माण चेंबूर येथील जमिनीवरील अतिक्रमण काढून टाकावे.