नवी मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पबाधितांना पुनर्वसन व पुनर्स्थापनेसाठी १२ आणि २२.५% योजनेअंतर्गत १ अशा एकूण १३ भूखंडांचे वाटप संगणकीय सोडतीद्वारे गुरुवारी सिडको भवन येथे करण्यात आले. यावेळी सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक शांतनु गोयल, मुख्य दक्षता अधिकारी सुरेश मेंगडे, मुख्य भूमी व भूमापन अधिकारी (न.मुं.आं.वि.) नवनाथ जरे, महाव्यवस्थापक (परिवहन व विमानतळ) गीता पिल्लई यांसह इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

पनवेल तालुक्यात ११६० हेक्टरवर जमिनीवर सिडको महामंडळ नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्प विकसित करत आहे. ज्यांच्या जमिनीवर हे विमानतळ होत आहे त्यांच्यासाठी राज्य शासन सिडकोच्या माध्यमातून सर्वोत्तम पुनर्वसन पॅकेजपैकी २२.५ टक्के विकसित भूखंड वाटप करत आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्प आणि तद्नुषंगिक कामांसाठी संपादित जमिनी व बांधकामांच्या मोबदल्यात प्रकल्पबाधितांना विकसित भूखंडांचे वाटप केले जात आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या सोडतीदरम्यान मौजे-चिंचपाडा विठ्ठलवाडी येथील २० मीटर पट्टा, राष्ट्रीय महामार्ग ४बी आम्रमार्ग, तसेच ७० मीटर आम्रमार्ग यांसाठी संपादित बांधकामधारकांना भूखंड देण्यात आले. तसेच २२.५% योजनेंतर्गत पूर्वी वाटप केलेली पात्रता रद्द करून नव्याने पात्र ठरलेल्या लाभार्थ्यांना भूखंड वितरित करण्यात आल्याची माहिती सिडकोच्या जनसंपर्क विभागाच्या अधिकारी प्रिया रातांबे यांनी दिली.