नवी मुंबई – नवी मुंबई महापालिका क्षेत्रात रविवारी रात्रीपासून पावसाला सुरुवात झाली असून सोमवारी सकाळी विजांच्या कडकडाटाबरोबरच मेघगर्जनेसह जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. गेल्या २४ तासात मोरबे धरणात जोरदार पाऊस झाला असून सोमवारी सकाळी ८.३० वाजेपर्यंत १५१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.
आज संततधार पावसाच्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी संपूर्ण महापालिका यंत्रणेस अलर्ट मोडवर राहण्याचे निर्देश दिले आहेत. आज सकाळी लवकरच सर्व विभागप्रमुख व विभाग अधिकारी आपापल्या कार्यक्षेत्रात मदत कार्यासाठी कार्यरत झाले आहेत. नागरिकांनी घाबरून न जाता कोणताही प्रकारच्या मदतीसाठी नवी मुंबई महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाशी 022-27567060 किंवा 022-27567061 या क्रमांकावर अथवा 1800222309 / 1800222310 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन आहे.
शहरातील पाऊस
२५/५/२०२५ सकाळी ८.३० ते २६/५/२०२५ सकाळी ८.३० पर्यंतचा पाऊस
बेलापूर – ७१.८० मिमी.
नेरूळ – ६६.२० मिमी
वाशी – १९.२० मिमी
कोपरखैरणे – १५.२०मिमी
ऐरोली – ८.०६ मिमी
दिघा – ८.२० मिमी
सरासरी पाऊस- ३१.५३मिमी.
मोरबे धरणातील पाऊस – १५१.२० मिमी
झाडे पडली -७