नवी मुंबई : गुरुवारी दिवसभर फक्त १८ मि.मी. पाऊस झाला होता. गुरुवारी सायंकाळनंतर शहरात पावसाने जोर पकडला असून शुक्रवारी दिवसभर दमदार पाऊस होत आहे. सकाळी आठ ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत ५६.२० मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
गेली काही दिवस पावसाने दडी मारली होती. बुधवारी रात्री १२ च्या सुमारास नवी मुंबईत काही काळ जोरधारांचा पाऊस झाला होता. गुरुवारी दिवसभर पावसाची अधूनमधून रिपरिप सुरू होती. मात्र शुक्रवारचा दिवस पावसाचा होता. सकाळपासून रात्री उशिरापर्यंत सातत्याने सर्वदूर पाऊस पडत होता. सर्वच विभागात चांगला पाऊस झाला आहे. सकाळी आठ ते सकाळी सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत शहरात एकूण ५६.२० मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. सर्वात कमी पाऊस बेलापूर विभागात ३३.६०मि.मी. पाऊस झाला तरी सर्वाधिक दिघा विभागात ६८.६० मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
दिवसभरातील पाऊस (मिलीमीटरमध्ये)
बेलापूर – ३३.६०
नेरुळ – ४०.६०
वाशी – ६७.८०
कोपरखैरणे – ६३.४०
ऐरोली -६३.४०
दिघा – ६८.६०
सरासरी पाऊस -५६.२०