नवी मुंबई : अनधिकृत झोपड्यांविरुद्ध नवी मुंबई महानगरपालिका अतिक्रमण विभागामार्फत नेरुळ विभागात कारवाई केली. नेरूळ पूर्व येथील भगवान बाबा गार्डन, सेक्टर ९, नेरुळ ग्रीनलॅन्ड अपार्टमेंटजवळ नवी मुंबई महापालिका जल उदंचन केंद्रासमोर भर रस्त्यात पदपथावर अनधिकृत झोपड्या वसवण्यात आल्या होत्या. त्या झोपडपट्टयांमधून अवैध व्यवसाय सुरू असल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. या ठिकाणी रात्री २० ते २५ लोक पदपथावरच झोपत असल्यामुळे सर्वसामान्य महिलांना वाट काढणे कठीण झाले होते.

हेही वाचा >>> नवी मुंबई : एकाच दिवशी घरफोडीच्या पाच घटनांची नोंद

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

त्याचबरोबर सर्वसामान्य नागरिकांना सदर रहिवाशांचा त्रास सहन करावा लागत होता याबाबत विभागातील नागरिकांनीही तक्रारी केल्या होत्या. त्यामुळे अतिक्रमण विभागामार्फत या ठिकाणच्या अनधिकृत झोपड्या हटविण्याची कारवाई करण्यात आली असून सामान जप्त करण्यात आले आहे. जप्त केलेल्या सामानामध्ये पाच बॅग, सहा पाण्याचे जार, कपडे भरलेले बोचके, दगडी चुली, आठ ताडपत्री, ७ दोरखंड, दोन प्लायवूड टेबल, दोन सोफे, दोन बेड, तीन टेबल, सहा मोठे प्लायवूड, ३ लहान प्लायवूड, पाच बॅनर, छत्तीस बांबू, एक हिरवी जाळी, चार प्लास्टिक खुर्च्या असे सामान जप्त करून कोपरखैरणे क्षेपणभूमी येथे जमा करण्यात आले आहे. ही कारवाई अतिक्रमण विभागातील अधिकारी व कर्मचारी, बारा मजूर, दोन पिकअप, एक डंपर, नेरुळ स्थानिक पोलीस पथका समवेत सुरक्षारक्षक यांच्यामार्फत करण्यात आली आहे.