पनवेल : महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या भोकरपाडा येथील जलशुद्धीकरण केंद्रातील विजेची कामे, स्थापत्य कामे तसेच मुख्य जलवाहिनीवरील दुरुस्तीच्या कामांसाठी सोमवार ते मंगळवार सायंकाळपर्यंत ३६ तासांचा पाणी पुरवठा कळंबोली, नवीन पनवेल, खांदाकॉलनी, काळुंद्रे व करंजाडे या वसाहतींसह अनेक गावांमध्ये होणार नसल्याची माहिती सिडको महामंडळाने जाहीर केली आहे. रहिवाशांनी रविवारी पाणी साठवून ठेवावे असे आवाहन सिडको मंडळाने केले आहे. मात्र अनेक महिलांनी साठविण्यासाठी जलवाहिनीतील नळांपर्यंत पाणी पुरवठा करावा, अशी मागणी केली आहे.

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला (एमजेपी) पाताळगंगा नदीतून उचलले पाणी पनवेल महापालिका क्षेत्र, सिडको मंडळ, जेएनपीटी आणि एमएमआरडीए यांना पुरवठा करण्यासाठीचे काम मागील दिड वर्षांपासून दिले आहे. मोठ्या व्यासाची जलवाहिनी नवीन टाकून त्यावर सक्शनपंप बसवून इतर कामे एमजेपीकडून सुरू आहेत. पनवेल महापालिकेला शंभर दश लक्ष लीटर पाणी याच कामामुळे मिळणार आहे. सोमवारी याच कामासाठी एमजेपीने पाणी पुरवठा बंद ठेवला आहे. रहिवाशांना सोमवारी पुर्ण दिवस आणि मंगळवारी सायंकाळपर्यंत पाणी पुरवठा होणार नसल्याने पाण्याची साठवणूक करण्याचा सल्ला सिडको मंडळाने दिला असला तरी नवीन पनवेल येथील सेक्टर ६-ए या परिसरातील सुंदर जीवन या इमारतीमधील रहिवाशांना मागील तीन महिन्यांपासून काही मिनिटेच पाणी पुरवठा होत आहे.

Dombivli water to Thane, Conspiracy, eknath shinde news, eknath shinde latest news,
डोंबिवलीचे पाणी छुप्या पद्धतीने ठाण्याला पळविण्याचे षडयंत्र, मनसेचे उमेदवार राजू पाटील यांचा मुख्यमंत्री पिता-पुत्रावर घणाघात
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले…
Mumbais air quality worsened from Diwali fireworks displays on first day itself
दिवाळीनंतरही मुंबईतील हवेच्या गुणवत्तेत सुधारणा नाहीच!, सलग पाच दिवसांच्या घसरणीमुळे अशुद्ध हवा
Bangladesh Power Supply Alert
Bangladesh Power Supply Alert : अदानी पॉवरचा बांगलादेशला वीज खंडित करण्याचा इशारा; मोहम्मद युनूस सरकार थकीत वीज बिल भरणार?
kalyan Dombivli firecracker shop
कल्याण-डोंबिवलीतील वर्दळीच्या रस्त्यांवरील फटाक्यांचे मंच हटवा, प्रवाशांसह वाहन चालकांची मागणी
jewellery worth two lakh stolen from woman at swargate st bus depot
दिवाळीत एसटी स्थानकात चोरट्यांचा सुळसुळाट; स्वारगेट एसटी स्थानकात महिलेकडील दोन लाखांचे दागिने लंपास
Pune air, bad air, Pune air at hazardous levels
पुण्याची हवा धोकादायक पातळीवर, बिघडलेल्या हवेचे परिणाम काय?
Constant changes in the states climate But wait for the winter
राज्यात थंडीची प्रतिक्षाच! पाऊस मात्र…

हेही वाचा : उरण: करंजा रस्त्याची वाट बिकट; कोंडीने नागरिक त्रस्त

सोमवार ते बुधवार या काळात पाणी पुरवठा बंद राहणार असल्याने सध्या काही मिनिटेच पाणी पुरवठा होत असल्याने सिडको मंडळाने पाणी साठविण्याच्या दिलेल्या सल्ल्यानुसार काही मिनिटांत पिण्यासाठी पाणी भरावे की साठविण्यासाठी याचा विचार नवीन पनवेल येथील रहिवासी करत आहेत. सिडको मंडळाने सोमवार ते मंगळवार असे दोन दिवस पाणी पुरवठा बंद राहणार असल्याचे सांगीतले असले तरी प्रत्यक्षात रविवारी रात्रीपासून पाणी पुरवठा कमी दाबाने होईल, तसेच मंगळवारी सायंकाळपासून कमी दाबाने पाणी पुरवठा सुरू झाल्यावर जलवाहिनीतून नेहमीप्रमाणे पुरवठा सुरळीत होण्यासाठी १० ते १२ तासांचा अवधी लागतो. त्यामुळे बुधवारी रात्रीपर्यंत पाणी पुरवठा पुर्ववत होण्यास विलंब लागण्याची शक्यता आहे.

हेही वाचा : उरण – खारकोपर लोकलचे उद्घाटन पंतप्रधान मोदींच्या हस्ते? पुन्हा चर्चा रंगली

त्यामुळे ३६ तासांचा पाणी बंदचा कालावधी प्रत्यक्षात रविवार ते बुधवार रात्री म्हणजेच चार दिवसांवर जाणार आहे. एमजेपीच्या या शटडाऊनच्या कामाचा परिणाम पनवेल तालुक्यातील निम्याहून अधिक रहिवाशांना सहन करावा लागणार आहे. करंजाडे येथील रहिवाशांनी ऑगस्ट महिन्यात बेलापूर येथील सिडको भवनावर मोर्चा काढल्यानंतर एमजेपी आणि सिडको या दोन्ही सरकारी प्रशासनातील अधिकाऱ्यांना जाग आली. त्यानंतर करंजाडे वसाहतीला पाणी पुरवठा करणाऱ्या जलवाहिनीला बूस्टरपंप लावल्याने काही अंशी रहिवाशांना सध्या दिलासा मिळाला होता. मात्र, बुधवारपर्यंत मोठ्या पाणी टंचाईचा सामना रहिवाशांना करावा लागणार आहे.