वाशीतील एपीएमसी घाऊक भाजीपाला बाजारात शुक्रवारी बाजारात भाज्यांची आवक वाढली असून विशेषतः गाजर , वाटाणा ,फ्लावर , कोबी या फळ भाज्यांना उठाव नसल्याने दर गडगडले आहेत. ३०% शेतमाल शिल्लक राहिला आहे. घाऊक बाजारात कोबीचे दर सर्वात कमी असून प्रतिकिलो २-३ रुपये बाजारभाव आहेत. त्यामुळे घाऊक बाजारात सध्या फळ भाज्यांचा स्वस्ताईचा हंगाम सुरू आहे. मात्र किरकोळ बाजारात दुप्पट दराने भाजी विक्री करून ग्राहकांची लूट सुरूच आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा- नवी मुंबई : जुना बटाटा हंगाम लवकरच संपणार; नवीन बटाटा पेक्षा जुना बटाट्याचे दर अधिक

नोव्हेंबरमध्ये पावसामुळे भाज्यांचे उत्पादन घटले होते. त्यामुळे एपीएमसी घाऊक बाजारात भाज्यांची आवक घटल्याने भाजीपाल्याच्या दरात वाढ झाली होती. पंरतु बाजारात आता हिरवा वाटण्याबरोबर इतर भाज्या तसेच पालेभाज्यांची आवक वाढली आहे त्यामुळे भाज्यांचे दर गगडगडले आहेत. शुक्रवारी एपीएमसी भाजीपाला बाजारात ६४१ गाड्या आवक झाली असून ४६५गाड्या भाजीपाला विक्री झाला आहे. त्यामध्ये हिरवा वाटाणा, गाजर, कोबी आणि फ्लॉवर याची जास्त आवक झाली आहे. हिरवा वाटाणा ३२०३ क्विंटल , ३२७०क्विंटल गाजर, फ्लॉवर २६७४क्विंटल, कोबी १९७३ क्विंटल आवक झाली आहे असून उठाव नसल्याने ३०% मला शिल्लक राहिला आहे, त्यामुळे दर घसरले आहेत अशी माहिती व्यापारी रामदास कदम यांनी दिली आहे.

हेही वाचा- नवी मुंबई : द्राक्ष हंगाम सुरू होण्याला महिना लागणार; घाऊक बाजारात द्राक्ष प्रतिकिलो ६०-१००रुपयांवर

भाजी- आता- आधी

वाटाणा २४ ते २६, २६-३०
गाजर १२ ते १३, १८-२६
कोबी २ ते ३, ६-८
फ्लावर ७ ते ८, १४-२०

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Reduction in the price of vegetables in apmc market navi mumbai dpj
First published on: 20-01-2023 at 15:13 IST