उरण : करंजा येथील दहा वर्षीय मयंकने धरमतर ते करंजा हे १८ किलोमीटर समुद्री अंतर ५ तास १३ मिनिटांत यशस्वीरीत्या पोहून पार केले आहे. तर, हे समुद्री अंतर पोहणारा मयंक हा पहिला जलतरणपटू ठरला आहे.

उरण तालुक्यातील करंजा येथील मयंक दिनेश म्हात्रे या दहा वर्षीय चिमुरड्याने रविवारी पहाटेच्या सुमारास धरमतर ते करंजा हे अंतर पोहण्याचा निश्चय केला होता. यावेळी, प्रशिक्षक हितेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अलिबाग तालुक्यातील धरमतर येथून सुमारे १८ किमी अंतर पोहताना समुद्राच्या लाटांवर स्वार झाला होता. तर, महाराष्ट्र राज्य हौशी जलतरण संघटनेचे निरीक्षक सुनील मयेकर यांच्या उपस्थितीत अलिबाग आणि उरण दरम्यानच्या मुख्य चॅनलमध्ये पोहत अंतर गाठण्यास सुरुवात केली होती.

हेही वाचा – आज हार्बर रेल्वे मार्गावर मेगा ब्लॉक

हेही वाचा – भाजपाच्या महाविजयाचा नवी मुंबईत महाजल्लोष

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यावेळी, प्रथमतःच सागरी अंतर पोहणाऱ्या मयंक याला जलतरणपटू आर्यन मोडखरकर आणि जयदीप सिंग यांनी साथ दिली. तर, समुद्राच्या भरतीच्या पाण्यावर पुढे जात सुमारे ५ तास १३ मिनिटांनी करंजा जेट्टीपर्यंतचे अंतर यशस्वीरीत्या पोहून पार केले. यावेळी, करंजा येथील किनाऱ्यावर असलेल्या गावकऱ्यांनी मयंक याचे अभिनंदन करीत शुभेच्छा दिल्या. तर, धरमतर ते करंजा हे अंतर पार करणारा मयंक हा पहिला जलतरणपटू ठरला आहे.