उरण: जगभरातील गणेशमूर्तींची नगरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या पेण मध्ये पर्यावरणस्नेही मूर्तींना मागणी वाढली आहे. त्यामुळे येथील अनेक कारखान्यात शाडूच्या मातीच्या व कागदाच्या लगद्यापासून गणेशमूर्ती साकारण्यात येत आहेत. प्लास्टर ऑफ पॅरिस व शाडूच्या मुर्ती पेक्षा कागदाच्या लगद्यापासून तयार करण्यात येणाऱ्या मूर्ती दहा टक्क्यांनी महाग असल्या तरी गणेशभक्तांकडून पर्यावरणस्नेही मूर्ती ची मागणी करण्यात येत असल्याची माहिती जोहे येथील मुर्तीकाराने दिली आहे.

गणेशोत्सव अवघ्या महिनाभरावर आला असून यंदाच्या उत्सवानिमित्त पर्यावरणपूरक अशा कागदाच्या लगद्याच्या मूर्तीची मागणी वाढू लागली आहे. तर, सजावट केलेल्या मूर्तीमध्ये वाढ झाली आहे.

हेही वाचा… नवी मुंबई : महिलेची हत्या केल्याचा नातेवाईकांचा आरोप; गुन्हा दाखल होईपर्यंत मृतदेह ताब्यात घेण्यास नकार

रायगड जिल्ह्यातील पेण हे गणेशाच्या मुर्ती बनविणाऱ्या कलाकारांची नगरी मानली जाते. वर्षाला ३०० कोटी रुपयांची उलाढाल करणाऱ्या या तालुक्यात पेण शहर, हमरापूर, जोहे, तांबडशेत अशा अनेक गावात मुर्ती तयार करण्यात येतात. तर, गेल्या काही वर्षात प्लास्टर ऑफ पॅरिस च्या मुर्तीवर निर्बंध लावण्यात आल्याने या व्यवसायावर आर्थिक परिणाम झाला होता. तर, पेण येथील गणेशमूर्ती या राज्यभरात पाठविण्यात येत असून परदेशातून देखील मोठी मागणी करण्यात येत आहे.

हेही वाचा… नवी मुंबई तिरंगामय, भव्य तिरंगा बाईक रॅलीमध्ये हजारो नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

त्यामुळे पेण येथील अनेक कारखान्यात यंदा शाडूच्या मातीच्या आणि कागदाच्या लगद्याच्या मूर्तींमध्ये वाढ झाली आहे. यामुळे, त्याने त्यांच्या कारखान्यात ५० टक्के पीओपी आणि शाडू मातीच्या गणपतींची निर्मिती केली असून कागदी लगद्याच्या मूर्त्यांची तयार केल्या असल्याचे सांगण्यात आले आहे. असलेल्या कागदी लगद्याच्या मुर्ती या विसर्जनाला देखील सोयीस्कर असल्याने अनेक भाविक या मूर्तीची मागणी करीत आहेत. तर, परदेशात देखील या कागदी लगद्याच्या मूर्ती ची मागणी वाढली आहे.