पनवेल: २८ सप्टेंबरला अनंत चतुर्दशीला दहा दिवसांच्या गणेशमुर्तींचे विसर्जन आणि ईदची मिरवणूक शहरातील एकाच मार्गावरुन निघणार असल्याने पोलिसांवरील ताण कमी करण्यासाठी नवी मुंबई पोलीस आयुक्तांनी सर्वच पोलीस अधिका-यांना शहरातील मुस्लिम समाजाच्या प्रतिनिधींशी चर्चा करुन दुस-या दिवशी ईदची मिरवणूक काढता येईल का याविषयी आवाहन करण्याचे आदेश दिले होते.

पोलीसांनी मुस्लिम समाजाचे धर्मगुरू आणि प्रतिष्ठीत नागरिकांसोबत बैठका घेतल्या. या बैठकांमुळे पोलीसांच्या आवाहनला प्रतिसाद देत मुस्लिम समाजाच्या प्रतिनिधींनी २८ ऐवजी २९ सप्टेंबरला ईदची मिरवणूक काढू असे बुधवारी रात्री जाहीर केले.

हेही वाचा… रेल्वे ब्लॉकमुळे एनएमएमटीच्या पनवेल-बेलापूर मार्गावर विशेष बससेवा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मुस्लिम बांधवांनी घेतलेल्या या निर्णयामुळे पनवेलचे सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक राजपूत यांनी हिंदू मुस्लिम भाई भाई या ब्रीदवाक्य प्रमाणे पनवेलमध्ये मुस्लिम बांधवांचे आचारण असल्याने समाधान व्यक्त केले.