Navi Mumbai Crime – नवी मुंबईतील कोपरखैरणे येथील उपनगरात एका ३५ वर्षीय महिला शिक्षिकेने दहावीच्या विद्यार्थ्यांसमोर व्हिडीओकॉल द्वारे अश्लील प्रकार केल्याची घटना उघडकीस आल्याने शहरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी एका विद्यार्थ्याच्या पालकांनी पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली होती. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी त्या महिला शिक्षिकेविरोधात पाॅक्सो कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करुन तिला अटक केली आहे. या प्रकरणात आणखी काही विद्यार्थी आता पुढे येऊ लागले आहेत. याच शाळेतील दोन विद्यार्थ्यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करत ही शिक्षीका त्यांनाही अश्लिल चॅट करण्यासाठी भाग पाडत होती असा जबाब दिल्याची माहिती आहे.

दरम्यान, कोपरखैरणे उपनगरातील लहान वस्त्यांमध्ये सुरु असणाऱ्या या शाळांच्या चौकशीची मागणी आता जोर धरु लागली आहे. या शाळांमध्ये अग्निशमन विभागाचे दाखले आहे का, तसेच विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी कोणती काळजी घेतली जात आहे, यासंबंधी तपासणी करण्याची मागणी शिवसेनेच्या (शिंदे) महिला जिल्हाप्रमुख शितल कचरे यांनी केली आहे.

काही दिवसांपूर्वी मुंबईत एका महिला शिक्षिकेने अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत लैंगिक संबंध ठेवून त्याच्यावर अत्याचार केल्याची घटना ताजी असतानाच, नवीमुंबईत देखील एक ३५ वर्षीय शिक्षिका व्हिडीओ कॉलच्यामार्फत विद्यार्थ्यांसमोर अश्लील प्रकार केल्याची घटना उघडकीस आली आहे. गेल्यावर्षी ही शिक्षिका दहावीच्या विद्यार्थ्यासोबत ऑनलाईन शिक्षण देत होती. यादरम्यान तिने स्वतःचे कपडे काढले आणि ती अर्धनग्न अवस्थेत होती. त्यावेळी एका विद्यार्थ्याने हा कॉल रेकॉर्ड केला होता. परंतू, जेव्हा विद्यार्थ्याच्या आईने त्याच्या मोबाईलमध्ये हा व्हिडीओ पाहिला. तेव्हा त्यांनी या प्रकरणी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी विद्यार्थी अल्पवयीन असल्यामुळे त्या शिक्षिकेविरुद्ध ‘पॉक्सो’ कायद्यानुसार गुन्हा नोंदवण्यात आला असून मंगळवारी तिला अटक केली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या प्रकरणात आणखी दोन विद्यार्थ्यांनी पुढे येऊन तक्रार नोंदवल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलिसांनी या शिक्षिकेला न्यायालयात हजर केले असता, तिला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तिचा मोबाईल तपासासाठी फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवण्यात आला आहे, जेणेकरून अशाच प्रकारचे इतर व्हिडीओ आहेत का, हे तपासता येईल, अशी माहिती पोलिसांनी दिली.

आणखी काही विद्यार्थी जाळ्यात ?

दरम्यान या शिक्षिकेने शाळेतील आणखी काही विद्यार्थ्यांसोबत असे कृत्य केले आहे का याची तपासणी आता कोपरखैरणे पोलीस करत आहेत. दोन विद्यार्थ्याच्या पालकांनी पोलिसांशी संपर्क साधून यासंबंधीची माहिती दिली आहे. या शाळेतील आणखी काही विद्यार्थ्यांना आपल्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न ही शिक्षीका करत होती का याची तपासणी केली जात आहे.