नवी मुंबई :  सीबीडी बेलापूर पोलीस ठाणे हद्दीमध्ये २० जून रोजी एक घरफोडी झाली होती. या गुन्ह्याचा तपास करीत असताना दोन संशयितांना ताब्यात घेतले व चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्यांची कबुली दिली. त्यांच्या अटकेने १२ गुन्ह्यांची उकल झाली असून दोघेही अट्टल चोर असल्याचे समोर आले आहे. ही कारवाई  कक्ष तीनने केली आहे. 

 हैदर अनारुल शेख (वय २५ राहणार  मफतलाल झोपडपट्टी, कळवा)  युसुफ नुर इस्लाम शेख (वय २६ वर्षे, राहणार  अली टॉवर, ठाकुरपाडा, मुंब्रा) अशी अटक आरोपींची नावे आहेत.२० जून रोजी सीबीडी पोलीस ठाणे हद्दीत घरफोडी झाली होती यात रोख रक्कम, सोन्या-चांदीचे दागिने, मोबाईल फोन व इतर वस्तू असा एकुण ७ लाख ५०हजार रुपयांचा मुद्देमाल चोरी करण्यात आला होता. याबाबत सीबीडी पोलीस ठाण्यात गुन्हाही नोंद करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास करताना गुन्हयाचे घटनास्थळावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे चित्रण तपासून तसेच विश्वसनीय बातमीदार यांच्या कडून प्राप्त माहिती व तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपी हे अभिलेखावरील असल्याची माहिती समोर आली.

हेही वाचा >>>बीपीसीएलच्या सिलेंडर वाहनांचे रस्त्यावर तळ; प्रवासी व नागरिकांच्या वाहनांना अडथळा

हेही वाचा >>>नवी मुंबई : खदानीत बुडालेल्या युवकाचा मृतदेह सापडला

आरोपी निष्पन्न झाल्यानंतर त्यांचा शोध घेतला असता आरोपी गुन्हा केल्यानंतर त्यांचे मुळ गावी मुर्शिदाबाद, पश्चिम बंगाल या ठिकाणी रेल्वेने पळून जाण्याचे प्रयत्नात असल्याचे समोर आले. त्यामुळे तातडीने वर्धा रेल्वे पोलिसांच्या मदतीने  त्यांना वर्धा रेल्वे स्टेशन येथेगीतांजली एक्सप्रेसमधून ताब्यात घेण्यात आले होते. दोन्ही आरोपींना दाखल गुन्हयात अटक करुन त्यांचेकडे केलेल्या तपासात १२ लाख १६ हजार ४२१ रुपयांचा मुद्देमाल आढळून आला. यात ९ लाख ५१ हजार ७११ रुपयांचे दोन सोन्याच्या लगड, १ लाख १० हजार रुपयांची गुन्ह्यात वापरलेली रिक्षा, ९७ हजार ९०० रुपयांचे ५ मोबाईल, ४ घड्याळे, २ स्मार्ट घड्याळे , एक टॅब , तसेच ५७ हजार ६३० रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे.   कायदेशीर कारवाई नंतर हा ऐवज  जप्त करण्यात आला आहे. यात त्यांनी सीबीडी येथील घरफोडी गुन्ह्याची कबुली दिली. तसेच एकूण १२ गुन्हे उघडकिस आणण्यात आलले आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दोन्ही आरोपींनी मिळून केलेले बारा  गुन्हे उघडकीस आले असून त्यात चार सीबीडी, सानपाडा, पावले शहर एनआरआय, आणि वडाळा  येथील प्रत्येकी एक तसेच कोपरखैरणे  रबाळे पोलीस ठाणे अंतर्गत प्रत्येकी दोन गुन्हे उघडकीस आले आहेत.