उरण : विश्वचषकाच्या अंतिम सामन्यांत भारतीय संघाचा विजय व्हावा यासाठी उरणच्या कलाकारांनी शुभेच्छा दिल्या आहेत. दिवाळी निमित्ताने उरणच्या एन आय हायस्कूल येथे रांगोळी प्रदर्शन भरविण्यात आले आहे. त्याचा रविवारी शेवटचा दिवस आहे. याच रांगोळी प्रदर्शनात रांगोळीच्या माध्यमातून भारतीय क्रिकेट संघाला विश्वचषकासाठी शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.

हेही वाचा : नवी मुंबई : एपीएमसीतील शौचालय वितरण घोटाळा, दोन कंत्राटदारांना अटक

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

न्यूझीलंडला पराभूत करून भारतीय क्रिकेट संघाने विश्वचषकाच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. त्यांचा सामना ऑस्ट्रेलिया संघाशी होणार आहे. भारतीय संघाने या न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात जोरदारपणे आपल्या फलंदाजी आणि गोलंदाजीने विजय मिळविला आहे. त्यामुळे हा विश्वचषक भारतच जिंकणार, असा विश्वास उरण मधील ज्येष्ठ कलाकार रघुनाथ नागवेकर यांनी व्यक्त केला आहे.