पनवेल : शेतकरी कामगार पक्ष आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील वादाचे प्रमुख कारण ठरलेले उरण मतदारसंघातील शेकापचे उमेदवार प्रीतम म्हात्रे यांनी आपण वरिष्ठ नेत्यांच्या आदेशानेच निवडणूक रिंगणात उडी घेतल्याचे स्पष्टीकरण लोकसत्ताशी बोलताना दिले. पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि उरण मतदारसंघातील एकेकाळचे तुल्यबळ उमेदवार माजी आमदार विवेक पाटील यांच्या आदेशानेच आपण निवडणूक लढवत असल्याचेही म्हात्रे यांनी स्पष्ट केले.

विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी लढत असली तरी उरण आणि पनवेल विधानसभा मतदारसंघांत महाविकास आघाडीतून शेकाप बाहेर पडला आहे. लोकसभा निवडणुकीत शेकाप महाविकास आघाडीचा एक भाग होता. उरण मतदारसंघात महाविकास आघाडीला १५ हजारांचे मताधिक्यही मिळाले होते. असे असले तरी म्हात्रे यांनी उमेदवारी दाखल केल्याने शिवसेना (ठाकरे) आणि शेकापचे बिनसले आहे. यामागील भूमिका स्पष्ट करताना प्रीतम म्हात्रे यांनी आपण वरिष्ठ नेत्यांच्या आदेशानुसारच निवडणूक रिंगणात आहोत असे सांगितले.

हेही वाचा – गव्हाण स्थानकाचे काम अपूर्णच! लोकल स्थानकात थांबण्याची प्रवाशांना अद्याप प्रतीक्षाच

हेही वाचा – मंदा म्हात्रेंसाठी शिंदे गटाची धावाधाव पुरेशी साथ मिळत नसल्याच्या मुख्यमंत्र्यांकडे तक्रारी

u

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कार्यकर्त्यांचा दबाव

उरण मतदारसंघात यापूर्वी विवेक पाटील हेसुद्धा आमदार म्हणून निवडून आले होते. उरण पट्ट्यात शेतकरी कामगार पक्षाची ताकद मोठी आहे. माझे वडील जे. एम. म्हात्रे यांनी उरण मतदारसंघात अनेक समाजोपयोगी कामे केली आहेत. गव्हाण कोपर हे म्हात्रे यांचे मूळ गाव आहे. त्यामुळे पक्षाने ही निवडणूक लढवावी असा कार्यकर्त्यांचा दबाव होता. आमच्या नेत्यांनी महाविकास आघाडीतील नेत्यांशी यासंबंधी चर्चा करण्याचा प्रयत्न केला. मात्र उरणमधून निवडणूक लढविण्याविषयी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते ठाम होते.